Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

छोटा राजन टोळीतील गुंडाला बालाजीनगरमध्ये पकडले

Date:

पुणे – छोटा राजन टोळीतील गुंडाला सहकारनगर पोलिसांनी बालाजी नगरातून जेरबंद केले. स्वप्नील सुनिल कुलकर्णी ( २७, धनकवडी ) असे त्या कुख्यात गुंडाचे नाव असून त्याच्याकडून एक कार्बाइन, तीन पिस्तूल व २१ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे.


पोलिसांनी जप्त केलेली काडतुसे खडकी येथील अ‍ॅनिमेशन फॅक्टरीतील असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती परिमंडल २ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ; स्वप्नील बालाजीनगर येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याने सहकारनगर पोलीस ठाण्यातील नाईक संजय भापकर यांना दिली होती.या माहितीनुसार उपायुक्त डहाणे, स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक दिपक निकम, गुन्हे शाखेचे निरीक्षक आप्पासाहेब वाघमारे , सहाय्यक निरीक्षक चेतन मोरे, हवालदार अभिमन्यु सोनवणे, विजय मोरे, चंद्रकांत फडतरे, सतिश चव्हाण, मनिष इंगळे, प्रविण कोकणे यांच्या पथकाने सापळा रचून स्वप्नील कुलकर्णी याला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी कुलकर्णी याच्या ताब्यातून एक कार्बाइन, ३ देशी बनावटीचे पिस्तूल, २१ जिवंत काडतुसे असा एकूण २ लाख ४ हजार ४०० रुपयाचा शस्त्रसाठा जप्त केला.
त्याचे वडील गुजरातमध्ये रेल्वे टीसी हेड म्हणून कामास होते. बारावीपर्यंत शिक्षण झालेला स्वप्नील कुलकर्णी विरार येथे रहात होता. त्यावेळी शेजारी राहणार्‍या व छोटा राजन टोळीचा सदस्य असलेल्या रोहित वर्मा नावाच्या तरुणामार्फत तो २०१० पासून छोटा राजन टोळीशी जोडला गेला. एका गुन्ह्यात जेलमध्ये गेल्यानंतर त्याचा संपर्क इतर गुंडाशी झाला. पुढे त्याने २०१२ मध्ये शिवाजीनगर न्यायालयात गोळीबार केला होता. याच दरम्यान तो छोटा राजन टोळीच्या गुंडांच्या संपर्कात आला.
स्वप्नील कुलकर्णी याच्यावर पुणे शहरात खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत. सद्या त्याच्या कारवाया मुबई व परिसरात सुरू आहेत. काही दिवसापासूनच तो धनकवडी येथे खोली भाड्याने घेऊन रहायला आला होता. त्याला २०१५ मध्येही पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेली शस्त्रे त्याच्या एका साथीदाराने नाशिक येथे त्याला दिली होती.
या शस्त्रांचा वापर करुन तो एका व्यक्तीचा खून करणार होता. कोणत्या व्यक्तीचा खून करायचा होता, हे त्या साथीदाराने स्वप्नील कुकलर्णी याला अद्याप सांगितले नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी जप्त केलेली काडतुसे खडकी येथील अ‍ॅनिमेशन फॅक्टरी येथील असल्याचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचेही डहाणे यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...