पुणे- १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. दरम्यान, देशात कोविशिल्ड लसीचं उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटने देशांतर्गत वितरणासाठी लसीचे दर जाहीर केले होते. त्यात केंद्र सरकारला १५०, राज्य सरकारांना ४०० आणि खासगी रुग्णालयांना ६०० रुपये दराने लस देण्याची घोषणा केली होती. दरम्यान, या दरांवरून सिरम इन्स्टिट्युटवर टीका झाली आहे. त्यानंतर आता सिरमकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
याबाबत सिरम इन्स्टिट्युटकडून एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सिरम इन्स्टिट्युट उत्पादित होणाऱ्या लसींमधील मोजका साठाच खाजगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रत्येकी दराने विक्री करणार आहे. ही रक्कम कोरोनावरील उपचारांसाठी लागणारी अन्य औषधे आणि साहित्याच्या तुलनेत फार कमी आहे, असेही सिरमने म्हटले आहे.