नवी दिल्ली-केंद्र सरकार राज्यांना कोरोनाच्या दोन्ही व्हॅक्सिन मोफत उपलब्ध करून देणार आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, केंद्र सरकारसाठी कोरोनाच्या दोन्ही व्हॅक्सिनचे दर 150 रुपये प्रति डोस राहतील. या दरामध्ये केंद्र व्हॅक्सिन खरेदी करून पूर्वीप्रमाणेच राज्यांना देईल. कंपनीकडून थेट व्हॅक्सिन खरेदी करण्याच्या स्थितीमध्येच राज्य सरकारला व्हॅक्सिनचे पैसे द्यावे लागतील.
कॉंग्रेसने उपस्थित केले होते प्रश्न
यापूर्वी काँग्रेस नेता जयराम रमेश यांनी व्हॅक्सिनच्या दराबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सोशल मीडियावर एक रिपोर्ट शेअर करत म्हटले होते की, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सीरम 600 रुपये प्रति डोसच्या दराने कोव्हीशील्ड व्हॅक्सिन देणार आहे. हे दर जगातील सर्वात जास्त आहेत.राज्य सरकारांना हे व्हॅक्सिन 400 रुपये दराने मिळतील. हे अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, सौदी, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकाच्या सरकारांकडून खर्च केल्या जाणाऱ्या दरापेक्षा जास्त आहेत. मेड इन इंडिया व्हॅक्सिनचा आपल्याच देशात एवढा जास्त दर का आहे? यामुळे या दरावर पुन्हा एकदा विचार करणे आवश्यक आहे.