पुणे-दि सिग्नेचर मास्टरक्लास या सिग्नेचर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर प्रायोजित कार्यक्रमाची सुरूवात पुण्यात अगदी आनंदी आणि उत्साहात करण्यात आली, या वेळी आपली यशोगाथा व आपल्या संघर्षपूर्ण जीवना विषयी व तिच्या चित्रपट सृष्टीतील प्रवासाची कहाणी राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना राणावत हिनें आपल्या चाहत्यांसमोर उलगडून दाखवली. सिग्नेचर मास्टरक्लास हा एक अनोखा असा मंच असून या मंचाच्या माध्यमातून पुण्यातील दि वेस्टन मध्ये लोकांना आपल्या आवडीच्या मार्गाने कशा प्रकारे यश मिळवले याची माहिती देण्यात येते.
एका क्रांतिकारी मुलीपासून सुरू झालेला हा प्रवास करता करता चित्रपटांची तसेच पात्रांची निवड करतांना सुध्दा क्रांतिकारी विचार करून स्टारडम प्राप्त करणारी कंगना राणावत हीने आपली पॅशन टू पे चेक ची यशोगाथा सांगितली. तीनें आपल्या पौगंडावस्थेत किती कठीण प्रसंगातून मार्ग काढले आणि त्यानंतर कशा प्रकारे जर आपल्याकडे एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्दअसेल तर त्यांतून नशीबावर हवाला न ठेवता यशस्वी होता येते, हे सांगितले.