पुणे : मेथडिस्ट मराठी चर्च’च्या वतीने पुण्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘ख्रिसमस कार्नीव्हल’ चा रविवारी समारोप झाला. कॅरल गीते ,कॉयर ग्रुप्सचे सुरेल सादरीकरण, सौंदर्य स्पर्धा, खेळ आणि खवय्येगिरीची संधी असलेल्या या ३ दिवसीय कार्नीव्हलला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गोळीबार मैदान येथे हा कार्निव्हल ८ ते १० डिसेंबर या कालावधीत पार पडला समारोपप्रसंगी माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते शिबा रावडे यांना ‘मिस मेथडिस्ट २०१७’ किताब प्रदान करण्यात आला.
शिबा रावडे यांना ‘मिस मेथडिस्ट २०१७’ किताब
यावेळी युवा नेते तुषार भामरे, रेव्हरंड चंद्रशेखर जाधव, रेव्हरंड प्रमोद फ्रेझर, ‘मेथडिस्ट मराठी चर्च’ चे सचिव अॅड. मार्कस देशमुख, अॅड. सॅमसन अॅण्ड्रयुज, विल्सन अॅण्ड्रयुज, विनय माळगे, वैशाली छपानी, मधूकर सोनवणे, स्टॅन्ली मूर्ती, जॉयन कोरे, नितीन चव्हाण, अभिषेक त्रिभूवन आदी उपस्थित होते. यावेळी मेथडिस्ट मराठी चर्च पुणे जिल्हा व्यवस्थापक रेव्हरंड आर. ए. उदगीरकर आणि बिशप स्कूलचे प्राचार्य जॉएल एडविन यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ईशा निर्माण यांनी केले तर अॅड. मार्कस देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.
दिनांक 8 डिसेंबर पासून सुरू झालेल्या या कार्नीव्हलचे उद्घाटन पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.डी.एन. यादव यांच्या हस्ते झाले. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर आयोजित हा कार्नीव्हल गोळीबार मैदान, शंकरशेठ रोड, पुणे येथे पार पडला.
‘भूतलावरील शांतता’ ही कार्नीव्हल ची थीम होती. ख्रिसमस एकत्रीत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यासाठी ह्या कार्नीव्हलमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्नीव्हलमध्ये पुण्यातील हचिंग्स हायस्कूल, सेंट हेलेना स्कूल संस्था सहभागी झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरातील प्रार्थना स्थळातील गायक-वादक मंडळीनी ख्रिसमस कॅरोल्स सादर केली. पंडिता रमाबाई मुक्ती मिशनच्या वतीने आयोजित नाटिकेतून सर्वधर्मीय एकात्मतेचे दर्शन घडवले !
योग, फिटनेस, एरोबिक्स, झुम्बा च्या कार्यशाळा तसेच विविध खेळ, फूड स्टॉल चे कार्नीव्हलमध्ये आयोजन करण्यात आले होते, तर सौंदर्य स्पर्धा आणि ‘लेसर शो’ हे कार्नीव्हल चे विशेष आकर्षण ठरले.चित्रपट निर्माते निलेश नवलाखा यांनीही कार्निव्हल ला भेट दिली