लोणी काळभोर च्या भटक्या विमुक्तांना हक्काचा निवारा देण्याची लोक जनशक्ती पक्षाची मागणी

Date:

पुणे :
लोणी काळभोर येथील टाकी माळ व कोळपे वस्ती या ठिकाणी वनविभागाच्या क्षेत्रामध्ये  तीन पिढ्यांपासून वास्तव्य असणाऱ्या  अनुसूचित जमाती (भटके विमुक्त)  समाजातील  रहिवाशाना  त्यांच्या  राहात असलेल्या वस्तीस  वनवासी निवारा हक्क  कायदयान्वये  निवारा द्यावा आणि अतिक्रमण कारवाई स्थगित करावी,अशी मागणी लोक जनशक्ती पक्षाने केली असून या आशयाचे  निवेदन लोक जनशक्ती पक्षाचे पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय अल्हाट ,प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे यांनी वनमंत्री दत्ता भरणे आणि आमदार अशोक पवार यांना उरुळी कांचन येथे दिले.
लोणी काळभोर टाकी माळ व कोळपे वस्ती या ठिकाणी वनविभागाच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या भटक्या विमुक्त समुदायाच्या रहिवाशांना अद्याप कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. वन हक्क कायद्यान्वये  अनुसूचित जाती व वनवासी आणि इतर पारंपारिक वनवासी यांचा निवासी हक्क मान्य करण्यात आलेला आहे. लोणी काळभोर ग्राम पंचायतीमध्ये वन क्षेत्राच्या हद्दीत २ वस्त्या शंभर वर्षांपासून राहत असून ग्रामसभेत त्यांच्या निवासासंबंधी ठराव करून वन खात्याला दिलेला नाही. त्यामुळे वारंवार अतिक्रमणविरोधी कारवाया होवून नुकसान सोसावे लागत आहे.   वन खात्याच्या अखत्यारीतील हा प्रश्न वन मंत्री आणि आमदार यांनी एकत्रितपणे सोडवावा,अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर  लोक जनशक्ती चे जिल्हा उपाध्यक्ष दामू चौधरी,सचिव दीपक भडके ,संघटक गोपी गायकवाड,राहुल उभे,उपाध्यक्ष प्रमोद राजगुरू,उपाध्यक्ष प्रमोद राजगुरू,उपाध्यक्ष रझिया खान,सविता रणदिवे यांच्या सह्या आहेत
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रस्ता वाहतुकीसाठी तुमच्या आंदोलनासाठी नाही, या महिलेने पेटविली क्रांतीची ठिणगी

क्रांती करणारे..वेडेच ठरविले जातात : तिला शाळेतून मुअलाला पिकअप...

कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांना गती-मुंढवा चौकात १२६ कोटींचा फ्लायओव्हर

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे,: कोरेगाव पार्क–कल्याणी...

खरात ची वरात कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स मधून रुग्णालयाकडे

अशोक खरातची प्रकृती बिघडली:छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ, उलट्यांचा त्रास;...