महिला अत्याचाराची प्रकरणे फास्टट्रॅक न्यायालयात चालवावीत -सीमाताई आठवले

Date:

पुणे : “देशभरात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणत वाढ झाली असून, याला आळा घालण्याकरिता सरकारने कडक कायदे करावेत. आरोपीना तात्काळ शिक्षा देण्यासाठी ही प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टात चालवावीत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) राष्ट्रीय नेत्या सीमाताई आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
शनिवार पेठ येथील पक्षाच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी सीमाताई आठवले बोलत होत्या. यावेळी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव,  शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, भाजपच्या पदाधिकारी स्वरदा बापट, रमेश मुळे, ऍड चित्रा वानुगडे, बेला मेहता आदी उपस्थित होते.
सीमा आठवले म्हणाल्या, “महिला सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. विकृत मानसिकतेला ठेचण्यासाठी कडक पावले उचलायला हवीत. महिला सुरक्षेसाठी, शेतकऱ्यांसाठी, झोपडीधारकांसाठी, भूमिहीनांना जमिनी देण्यासाठी ‘रिपाइं’ने रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलने केली. नागरिकत्व कायद्याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व आमचा पक्ष सरकारसोबत आहे. राज्यभर एक कोटी सभासद नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने काम सुरु असून, २ एप्रिलपर्यंत हे पूर्ण करणार आहोत. यामध्ये महिलांनाही मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येणार आहे.”
स्वरदा बापट यांनीही मनोगत व्यक्त केले. शैलेंद्र चव्हाण यांनी आभार मानले
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे म्हाळुंगे स्विचिंग उपकेंद्राला मिळणारा वीजपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

पुणे : एका अज्ञात वाहनाने मंगळवारी (दि. २१) दुपारी ५ वाजेच्या सुमारास धडक दिल्याने ४०० केव्ही कुरुळी अतिउच्च दाब उपकेंद्रातून निघणाऱ्या २२ केव्ही म्हाळुंगे स्विचिंग इनकमर आणि २२ केव्ही एमआयडीसी डबल सर्किट फीडरला आज (दि. २१) फटका बसला आहे. वाहनाच्या...

ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यावसायिकांच्या संस्थेची पुण्यात होतेय स्थापना

पुणे- शहरातील अल्पसंख्यांक व ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यापारी...

अध्यक्षपदाची गाडी नाकारून बचतीचा निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा बाप्पू मानकर यांचा निर्णय

विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी राघवेंद्र (बाप्पू) मानकर बिनविरोध.. पुणे:...

रेल्वेकडून उन्हाळी सुटीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण देशात 18262 उन्हाळी विशेष रेल्वे फेऱ्या

गर्दीच्या हंगामात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी 11294 फेऱ्यांची आधीच घोषणामध्य...