५ हजार विद्यार्थी सलग १६ व्या वर्षी देणार समतेचे संदेश

Date:

पुणे :

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ( आझम कॅम्पस )तर्फे गुरुवार,२८  नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० पासून महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे .

संस्थेचे सचिव लतीफ मगदूम यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन होईल.आझम कॅम्पस,भवानी पेठ,गंज पेठ  ते महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक(समता भूमी)  हा या  अभिवादन मिरवणुकीचा मार्ग आहे.

या मिरवणुकीत महात्मा फुले यांच्या मानवतावादी, शिक्षण विषयक, शिकवणुकीचे संदेश देणारे फलक हाती घेतले जाणार आहेत. संस्थेच्या ३० शैक्षणिक आस्थापनातून ५ हजार विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक , विश्वस्त, संचालक तसेच ‘अवामी महाज ‘ या सामाजिक संस्थेचे सदस्य सहभागी होणार आहेत .

या अभिवादन मिरवणुकीचे हे १६ वे वर्ष आहे . संस्थेतर्फे दरवर्षी छ. शिवाजी महाराज, महात्मा गांधी, म.फुले, डॉ.आंबेडकर तसेच प्रेषित महमद पैगंबर या महामानवांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन मिरवणुका काढल्या जातात. आणि मानवतावादी संदेश दिले जातात

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वंदे भारत स्लीपरसाठी रेल्वेचा ८३९ कोटींचा करार; अमेरिकेच्या वॅबटेक कंपनीला मोठी ऑर्डर!

५० वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी ब्रेक, स्वयंचलित दरवाजे आणि...

पुण्यात भाजपच्या निवडणूक व्यवस्थापनावर प्रश्न ; रणनीतीचा आढावा होणार?

पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपने संघटनात्मक...

नागपूर-पुण्यात भाजपला जोरदार धक्का! विधान परिषदेच्या पाच जागांपैकी तीन महाविकास आघाडीच्या ताब्यात

फडणवीस-गडकरींच्या नागपुरात काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी; पुणे पदवीधरमध्ये शरद...

बुटांच्या तळात लपवून १३.४४ लाखांचा हॅशिश घेऊन बँकॉकहून आलेला प्रवासी पुणे विमानतळावर पकडला

स्पोर्ट्स शूजमध्ये तयार केले होते विशेष गुप्त कप्पे; ३८१.२७...