खेळाडू ,दिव्यांगांचे प्रशिक्षक ,सामाजिक कार्यकर्त्यांचा होणार गौरव
डॉ .कुमार सप्तर्षी यांच्या उपस्थितीत ४ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन
पुणे :’म्हाळूपार्वती प्रतिष्ठान’ च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय स्पर्धात सहभागी झालेले पुण्यातील दिव्यांग खेळाडू ,दिव्यांग खेळाडूंचे प्रशिक्षक ,सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार आहे .
‘युक्रांद ‘चे संस्थापक ,माजी आमदार डॉ .कुमार सप्तर्षी यांच्या उपस्थितीत ४ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . हा कार्यक्रम पंडित भीमसेन जोशी कलादालन ,औंध ,पुणे येथे ४ एप्रिल ४ वाजता होणार आहे .
प्रतिष्ठान चे अध्यक्ष निलेश प्रकाश निकम यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली . कार्य्रक्रमाच्या नियोजनासाठी प्रतिष्ठानची नुकतीच बैठक झाली . या बैठकीला निलेश निकम ,प्रकाश निकम ,पूनम हेंद्रे ,डॉ . संजय जोशी ,विलास निकम ,बबन निकम ,शैलेश हेंद्रे ,विशाल सुर्वे ,बाळासाहेब हेंद्रे ,अतुल जोशी ,श्रद्धा जोशी उपस्थित होते .
कार्यक्रमाला डॉ कुमार सप्तर्षी ,माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार ,अभिनेते प्रसाद सुर्वे ,मिलिंद शंभरकर (समाज कल्याण विभागाचे आयुक्त ),नितीन ढगे (अपंग कल्याण विभागाचे उपायुक्त ),दत्ता साने (विरोधी पक्षनेते ,पिंपरी -चिंचवड मनपा ),राजेंद्र गोळे (जिल्हा अधीक्षक ,भूमी अभिलेख विभाग ) हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .
याच कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रात कार्यरत शाळांना बॅटरी वरील ध्वनिक्षेपण यंत्रणा ,खेळाडूंना मोबाईल संच ,ट्रॅक सूट ,बॅग ,प्रथमोपचार पेटी ,सन्मानचिन्ह असा संच भेट दिला जाणार आहे .