पुणे :
भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूर्वा ढेरेला ‘श्नायडर इलेक्ट्रिक’ ची वार्षिक ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे . भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आनंद भालेराव यांनी ही माहिती दिली . पूर्वा ढेरे ही या महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे .प्राचार्य डॉ . आनंद भालेराव आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग विभागाचे प्रमुख दीपक बनकर यांनी तिचे अभिनंदन केले .