भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रि
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता ‘ विषयावर ३ दिवसीय कार्यशाळा
पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रि की महाविद्यालयात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता),इंटरनेट ऑन थिंग्स ‘ विषयावर ३ दिवसीय कार्यशाळा ‘ग्लोबल अकॅडेमिक इंटर्नशिप प्रोग्रॅम ‘ च्या सहकार्याने नुकतीच धनकवडी कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आली होती . राजेश गोपाल (अध्यक्ष ,गुरुकुल ) मंजुनाथ रोडगी आणि आदर्श कुमार (सदस्य ,मोझिला कॅम्पस क्लब ) यांनी मार्गदर्शन केले .
राजेश गोपाल (अध्यक्ष ,गुरुकुल ) मंजुनाथ रोडगी यांनी प्रत्यक्ष उदाहरणे देऊन दोन्ही संकल्पनांचे विवेचन केले . ‘तंत्रज्ञानाचा वेग वाढत असताना विद्यार्थ्यांनी नव्या ज्ञानाने स्वतःला अद्ययावत ठेवावे ‘,असे आवाहन त्यांनी केले .