विशेष मुले,बालरुग्ण आणि दिव्यांगांनी अनुभवला ‘ ख्रिसमस पार्टी ‘ चा आनंद !
‘रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल ‘ चा सलग १५ व्या वर्षी उपक्रम
पुणे :खेळ, संगीत, खाऊ आणि सांताक्लॉजने दिलेल्या गिफ्टस् अशा वातावरणात विशेष मुले ,बालरुग्ण आणि दिव्यांगांनी आनंद लुटला !
निमित्त होते रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल आयोजित ‘ ख्रिसमस पार्टी ‘ चे.
कॅम्पमधील ‘ द लेडीज क्लब ‘ येथे ही ‘ ख्रिसमस पार्टी ‘ मंगळवार दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी झाली.
विविध हॉस्पिटल मधील असाध्य विकारांनी पीडित लहान मुले, मूकबधीर शाळातील विद्यार्थी, दिव्यांग, मनोरुग्ण, तसेच अनाथगृहातील २५० मुले या पार्टीत सहभागी झाली. नवक्षितीज, एकलव्य फाऊंडेशनमधील मुलेही सहभागी झाली.
रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल चे अध्यक्ष रवी कपूर, इनरव्हील क्लब च्या अध्यक्ष् आशा नायक, अनील बोरा यांनी स्वागत केले. ‘ द लेडीज क्लब ‘ तसेच सतीश शेट्टी यांनी सहकार्य केले.
या उपक्रमाचे हे पंधरावे वर्ष होते.