र्हिदम वाघोलीकर, रचना शाह ‘वॉव अॅवार्ड’ ने सन्मानित
पुणे : ‘ब्लिस इक्विटी प्रकाशन’च्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱयांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्मित्त्वांवर लेखन करणारे युवा लेखक र्हिदम वाघोलीकर आणि रचना खडीकर – शहा यांना ‘आयकॉनिक मोस्ट सेलिब्रेटेड बुक ऑफ द इयर’ (वॉव अॅवार्ड) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘सिम्बायोसिस इंटरनॅशनल ऑडिटोरियम’ येथे हा कार्यक्रम रविवारी, १५ जुलै रोजी झाला.
खासदार वंदना चव्हाण, मराठी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी आणि दारसिंग खुराना यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘ब्लिस इक्विटी प्रकाशन’च्या अध्यक्ष शोभा आर्य होत्या.
यामध्ये आशय वाघोलीकर, प्रतीक रोकडे, डॉ.सोनाली जाधव, गीता सिंग, संदीप सोपारकर, फ्रेडी दारुवाला, संगीता शेट्ये, अर्चना भिडे, अविनाश गवई, शर्वरी जमीनीस, अनुराधा करमरकर आदींना सन्मानित करण्यात आले.