जलस्त्रोताचे संरक्षण करण्याची मागणी -नैसर्गिक झर्‍याचे पूजन

Date:

पुणे : ‘माणसांना नद्यांशी जोडा आणि ओढ्यांना हदयाशी’ हे ब्रीद घेऊन बावधन परिसरात जलप्रेमी झर्‍याच्या संरक्षणासाठी एकत्र आले आणि सर्वानुमते  जलपूजन झाले.
बावधन येथे नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोत असलेल्या झर्‍याचे पूजन करण्यात आले. बावधन येथे झरा जलदेवता मंदिर म्हणून घोषित करण्यात आले. नैसर्गिकरित्या उपलब्ध होत असलेले जलस्त्रोत बंद होऊ नयेत म्हणून त्या जागेचा परिसर आरक्षित करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी कोथरूड प्रभाग समिती अध्यक्षा अल्पना वरपे, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, नगरसेवक किरण दगडे, केंद्रीय भूजल विभागाचे शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे, जलबिरादरीचे सुनील जोशी, जीवित नदीचे उपासनी, वनराईचे मुकुंद शिंदे, राम नदी स्वच्छता अभियानाच्या शांता सबनीस, मधुकर दळवी, शैलेंद्र पटेल, गणेश वरपे आदी उपस्थित होते.
भूजलशास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे म्हणाले, ‘जलस्त्रोत बंद होऊ नये म्हणून या जागेवर संरक्षण आवश्यक आहे. इथे अवजड वाहने आणू नयेत. इथे फक्त उद्यान करावे. याबाबत रिपोर्ट दिला.’ बावधनचे नागरिक दर रविवारी 7 ते 8 जण सहभागाने श्रमदान करून हा परिसर स्वच्छ करणार असल्याची माहिती यावेळी शैलेंद्र पटेल यांनी दिली.
वर्षाला साडेतीन लिटर पाणी
 
बावधनमधील ओढ्यातील भर उन्हाळ्यात आजसुद्धा प्रतिदिन एक लाख लिटर आणि वर्षाला साडेतीन कोटी लिटर पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध जीवंत झर्‍यातून मिळत आहे.
त्यामुळे त्याचे पुनरुज्जीवन आणि संरक्षण करण्यासाठी मागील वर्षभर प्रयत्न करण्यात आले असून, या पाण्याच्या प्रवाहांना शासनाने आरक्षित करावे व त्यांना ऐतिहासिक ठेव्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
नगरसेवक अल्पना वरपे म्हणाल्या, ‘नैसर्गिक जलस्त्रोतांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन व नागरिक यांनी एकत्र करून प्रयत्न केले पाहिजेत. झरा आरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.’
नगरसेवक किरण दगडे म्हणाले, ‘बावधन परिसरातील नैसर्गिक झरा व राम नदी स्वच्छता करण्यासाठी बजेट देण्यात आले आहे. जैव विविधता समिती व आयुक्त यांची पाहणी करून झरे व नदी संरक्षणाचा प्रयत्न करणार आहे’
नगरसेवक दिलीप वेडे-पाटील म्हणाले, ‘झरा परिसरातील स्वच्छता तातडीने करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे. नैसर्गिक जलदेवता मंदिर संरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.’
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकनाथ शिंदेंना राजी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी

:विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी युतीत हालचालीमुंबई-- राज्यातील विधानपरिषदेच्या ...

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात पुण्यात आम आदमी पार्टीचा बैलगाडी मोर्चा

सरकारी पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी पुणे महानगरपालिकेला आम आदमी पार्टीचे...

पुण्यात पहिली ‘रोबोटिक-आसिस्टेड’ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी.पारंपारिक ‘ओपन-हार्ट’ सर्जरीला आधुनिक पर्याय

पिंपरी,पुणे दि २५ मे, २०२६- पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी झाली आहे. पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पुण्यात पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीला (Open-Heart Surgery) हा एक सुरक्षित, जलद आणि आधुनिक पर्याय ठरला आहे. पिंपरी-चिंचवड येथील एका ४६ वर्षीय महिलेला 'रुमॅटिक हार्ट डिसीज' (Rheumatic Heart Disease - RHD) म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर हृदयाच्या झडपांना (व्हॉल्व्हला) होणारा आजार झाला होता, ज्यामुळे त्यांच्या हृदयाचा मिट्रल व्हॉल्व्ह म्हणजे 'रक्तप्रवाह नियंत्रित करणारा पडदा खराब झाला होता. हा व्हॉल्व्ह बदलण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज होती. पारंपारिक पद्धतीनुसार, अशा शस्त्रक्रियेसाठी छातीचे हाड (Breastbone) मधोमध कापून 'ओपन-हार्ट सर्जरी' करावी लागते. यामध्ये रुग्णाला खूप जास्त वेदना होतात, बरे होण्यास अनेक महिने लागतात आणि छातीवर मोठी जखम (डाग) राहते. पारंपारिक पद्धतीला फाटा देत डीपीयूच्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यामध्ये छातीचे मुख्य हाड न कापता, बरगड्यांच्या मधून लहान छिद्र पाडून ही शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षितपणे पार पाडण्यात आली. हाडांना कोणतीही इजा न झाल्यामुळे पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीच्या तुलनेत रुग्णाचा त्रास आणि वेदना खूपच कमी झाल्या. या आधुनिक उपचार पद्धतीमुळे रुग्णामध्ये अतिशय जलद सुधारणा झाली आणि ती अवघ्या काही दिवसांतच स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली. या शस्त्रक्रियेनंतर छातीवर कोणताही मोठा किंवा विद्रूप डाग राहिला नाही, एकंदरीत, कमीत कमी त्रासाच्या या सुरक्षित उपचारामुळे रुग्ण अवघ्या अवघ्या दोन आठवड्यांतच आपल्या नेहमीच्या कामावर परतणे सहज शक्य झाले. "डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय शस्त्रक्रिया विभागातील तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. आशिष बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात पहिली ऐतिहासिक रोबोटिक हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. भूलतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. वेणूराज वारके आणि यांच्या बहुविभागीय तज्ज्ञ टीमने यशस्वीरीत्या ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती अतिशय वेगाने सुधारली. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्ण स्वतःहून चालण्या-बोलण्यास आणि दैनंदिन हालचाली करण्यास सक्षम झाला. तिसऱ्या दिवशी रुग्णाने हॉस्पिटलच्या जिममधील पुनर्वसन (Rehabilitation) सुविधेतही सहभाग घेतला. महिन्यांऐवजी अवघ्या काही दिवसांतच रुग्ण पूर्णपणे निरोगी व्यक्तीसारखा धावपळ करू लागला. "पुण्यातील पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने करण्यात आलेली हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वी करणे हा आमच्यासाठी एक अभिमानाचा टप्पा आहे. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने नेहमीच अत्याधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उत्कृष्टतेचा मेळ घालून रुग्णांना सुरक्षित आणि जागतिक दर्जाचे उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहे." – मा. डॉ. पी. डी. पाटील (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे) "हा टप्पा आमच्या रुग्णांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या ध्येयाची साक्ष देतो. आम्ही हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण, ECMO अशा सर्व प्रगत कार्डिओ-थोरॅसिक शस्त्रक्रिया करत आहोत. आता रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांच्या सेवेचा दर्जा आणखी उंचावला आहे."...