पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त ’वन स्टेप फाऊंडेशन ’च्या वतीने आणि
’एसजीएम मॉल ’च्या सहकार्याने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणां
च्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक २६ जानेवारी रोजी एसजीएम मॉल, मोलेदिना रोड कॅम्प येथे सायंकाळी ५. ३० वाजता होणार आहे. सत्कारार्थीना’पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस ’च्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत इंदिरा भिलारे (संस्थापक/अध्यक्ष बहुउद्देशीय धर्मादाय संस्था), विराज तावरे, सचिन बेनकर, महेश घाग, पुजा भाले या पाच जणांचा सत्कार करण्यात येणार आहे.
समाजात सुधारणा घडवून आणणे आणि समाजाच्या चांगल्या भविष्यासाठी उपक्रम राबवले जावे या हेतूने स्थापन झालेल्या ’वन स्टेप फाऊंडेशन
‘संस्थेच्या वतीनेया वर्षी प्रथमच या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाची
संकल्पना पर्यावरण संरक्षण अशी आहे. तरुणाईला पर्यावरणविषयक जनजागृती करणे आणि प्रोत्साहन देणे हा या मागचा प्रमुख हेतू आहे.
सन्मानार्थींचा परिचय पुढील प्रमाणे :
इंदिरा भिलारे (संस्थापक/अध्यक्षबहुउद्देशीय धर्मादाय संस्था) यांचा आपल्या संस्थेमार्फत कष्टकरी व बिगारी कामगार यांच्या मुलांकरिता स्वतः शिकवणी घेणे, आहार व औषध उपचार करणे, अशाप्रकारची जबाबदारी स्वीकारून समाजहिताचे कार्य केल्याबद्दल,
विराज तावरे यांचा गडाकोट व सह्याद्रीमधील छोट्या गावातील मुलांचे शिक्षण व पोषण अशाप्रकारची जबाबदारी स्वीकारून समाजहित कार्य केल्याबद्दल,
सचिन बेनकर यांचा सायकल चालवा- इंधन वाचवा, आरोग्य सांभाळा हा संदेश पोहचविण्यासाठी वाघा बॉडर ते पुणे असा 2100 की.मी. चा बिकट प्रवास सायकलद्वारे पूर्ण केल्याबद्दल,
महेश घाग यांचा अभिनयाने रंगभूमी व टेलीव्हिजनवर एक वेगळा ठसा उमटविला आहे. सध्या सुरु असलेली आपली मलिका ‘लागीर झालं जी’ यातील फौजी या व्यक्तिरेखेने आपण सर्व रसिकांना आपलेसे केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी,
तसेच पुजा भाले यांचा पर्यावरणाच्या व वन्यजीव संरक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.