‘स्कूल ऑफ आर्ट अॅण्ड आर्ट अॅकॅडमी’ चे ‘आर्ट वॉक अॅण्ड ग्राफिटी वॉल’ प्रदर्शन
महेंद्र थोपटे आणि विपुल खटावकर यांच्या शिल्पकलेचे प्रात्यक्षिक
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या स्कूल ऑफ आर्ट अॅण्ड आर्ट अॅकॅडमी च्या वतीने वार्षिक ‘आर्ट वॉक अॅण्ड ग्राफिटी वॉल 2017-18’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे आणि भिंती चित्रांचे (ग्राफिटी वॉल) उद्घाटन दिनांक 26 आणि 27 जानेवारी 2018 रोजी होणार आहे. टी.एस.भाळ (माजी सहाय्यक पोलीस महासंचालक) यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता, हाय टेक हॉल येथे होईल, अशी माहिती ‘स्कूल ऑफ आर्ट अॅण्ड आर्ट अॅकॅडमी’च्या संचालक हेमा जैन यांनी दिली.
यंदाचे प्रदर्शनाचे 10 वे वर्ष आहे.
या प्रदर्शनातंर्गत ग्राफिटी वॉल चे (भिंती चित्र) उदघाटन करण्यात येणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार महेंद्र थोपटे आणि विपुल खटावकर यांच्या शिल्पकलेचे (मातीकाम) प्रात्यक्षिक होणार आहे. तसेच अनेक चित्रकारांच्या गाजलेल्या चित्रांच्या प्रतिकृती आणि मांडणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यातील काही चांगली निवडक चित्र या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पी.ए.इनामदार (अध्यक्ष, एम.सी.ई. सोसायटी) असणार आहे.
कार्यक्रमाला आबेदा इनामदार (उपाध्यक्ष,एम.सी.ई. सोसायटी), लतिफ मगदूम (सचिव,एम.सी.ई. सोसायटी), प्रा. इरफान शेख (सहसचिव,एम.सी.ई. सोसायटी), महाविद्यालयाचे प्राचार्य भारत लोंढे (स्कूल ऑफ आर्ट) उपस्थित राहणार आहेत.