गॅम्बियाचे राजदूत जैनब जगने आणि कॉन्सुल जनरल एली बाह यांची आझम कॅम्पसला भेट
गॅम्बियाच्या शिक्षण व्यवस्थेत योगदान देण्याचे आवाहन
पुणे :गॅम्बिया च्या भारतातातील राजदूत जैनब जगने आणि कॉन्सुल जनरल एली बाह यांनी मंगळवारी सकाळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी(आझम कॅम्पस) ला भेट देऊन विविध महाविद्यालयांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी केली . संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस चे संचालक आर . गणेसन यांनी स्वागत केले . आझम कॅम्पस च्या असेम्ब्ली हॉल मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला .
‘महाराष्ट कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक प्रगतीने आम्ही प्रभावित झालो आहोत . गँबिया च्या शैक्षणिक व्यवस्थेत आणखी गुणवत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून संस्थेने गॅम्बिया च्या शिक्षण व्यवस्थेत योगदान द्यावे ‘असे आवाहन गॅम्बियाच्या भारतातील राजदूत जैनब जगने यांनी केले .
‘आझम कॅम्पस मधील शैक्षणिक वातावरण प्रभावित करणारे आहे .येथील विध्यार्थी ,प्राध्यापक ,संस्थेचे नेतृत्व यांचा चांगला अनुभव आम्हाला आला . गॅम्बिया तील आणि भारतातील सामाजिक वातावरण सारखे असल्याने येथील शैक्षणिक प्रगतीचे मॉडेल गँबियात देखील उभे राहावे आणि त्यासाठी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीची मदत व्हावी अशी आमची इच्छा आहे. गॅम्बिया तील कृषी आणि शिक्षण क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी भारतीयांसाठी उपलब्ध असून व्हिसा प्रणाली देखील सुलभ आहे ‘असे उद्गार कॉन्सुल जनरल एली बाह यांनी काढले .
डॉ पी ए इनामदार म्हणाले,’गँबियाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये योगदान देण्याच्या विनंतीला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ . तेथील प्राध्यापक ,शिक्षकांना प्रशिक्षण ,तंत्रज्ञानाची मदत आणि विद्यार्थी-प्राद्यापक आदान -प्रदान उपक्रम आखता येण्यासारखे आहेत . त्यासाठी लवकरच एकत्रित चर्चा केली जाईल ‘
यावेळी तन्वीर इनामदार ,एस ए इनामदार ,गँबियाचे प्रोटोकॉल ऑफिसर रहमान ,श्री .पंजाबी इत्यादी उपस्थित होते