पर्वती, पद्मावती विभागात वीजपुरवठा सुरळीत

Date:

पर्यायी व्यवस्थेतून चक्राकार भारनियमन टाळले

पुणे, दि. 10 ऑक्टोबर 2020 : महापारेषणच्या नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आल्यानंतर महावितरणच्या पर्वती व पद्मावती विभागात आज दुपारी 1.13 वाजेनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. महापारेषण व महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर तांत्रिक उपाययोजना करून दुपारनंतर चक्राकार भारनियमन टाळण्याची कामगिरी केली.

याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या लोणीकंद ते जेजुरी या 400 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीत बिघाड झाला व वीजपुरवठा बंद पडला होता. त्यामुळे जेजुरी ते कोयना टप्पा क्र. 4 या 220 केव्ही अतिउच्चदाब वाहिनीचा व त्यावरील नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्राचा देखील वीजदाब कमी झाला होता. या उपकेंद्रातील कमी वीजदाबामुळे महावितरणच्या पर्वती व पद्मावती विभागातील 82 वीजवाहिन्यांवर आज (दि. 10) सकाळी 8.35 वाजेपासून चक्राकार पद्धतीने दोन ते अडीच तासांचे विजेचे भारनियमन सुरु करण्यात आलेहोते. परंतु, महापारेषण व महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्राचा पूर्ण दाबाने वीजपुरवठा सुरु करण्यासाठी तसेच चक्राकार भारनियमन टाळून पर्वती व पद्मावती विभागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर केले. यामध्ये तांत्रिक उपाययोजना पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1.13 वाजता नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आणि पर्वती व पद्मावती विभागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

संकटसमयी धावून आले ‘पीएमआरडीए’चे देवदूत! मुसळधार पावसात युद्धपातळीवर बचावकार्य; शेकडो नागरिकांचे वाचवले प्राण!

मावळ, लोणावळा परिसरात दरड कोसळल्याच्या दुर्घटनांनंतर 'पीएमआरडीए'च्या 'पीडीआरएफ'कडून तात्काळ...

महापालिकेकडून ७५ कुटुंबांतील ३०० नागरिकांना निवारा

पुणे, दि. ६ :पुणे शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर...

पुणेकरांना दिलासा; ७ जुलैपासूनची पाणीकपात ११ जुलैपर्यंत स्थगित

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय पुणे | प्रतिनिधी पुणे शहरात १५...