ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशीलकुमारवर पोलिसांनी ठेवले 1 लाख रुपयांचे बक्षीस

Date:

नवी दिल्ली -छत्रसाल स्टेडियममध्ये ज्यूनिअर गोल्ड मेडलिस्ट सागर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सुशील कुमारची अटकपूर्व जामीन याचिका दिल्लीतील रोहिणी न्यायालयाने फेटाळली आहे. सुशील कुमार अजूनही फरार आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांनी आता ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमारवर 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. त्‍यासोबतच त्यांचे स्वीय सहाय्यक अजयवरदेखील 50 हजार रुपायांचे बक्षीस ठेवले आहे. सुशील आणि अजयसह इतरही आरोपींविरोधात दिल्ली पोलिसांनी अजामीनपात्र वारंट जारी केले आहे.

या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी यापूर्वी लुकआऊट नोटीस जारी केली होती.न्यायालयात मंगळवारी संबंधित प्रकरणावर सुनावणी झाली. दरम्यान, त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता न्यायालयाने आपला निकाल दिला. आरोपी सुशील कुमारने काही दिवसांपूर्वी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती.संबंधित प्रकरणातील ही सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जगदीश कुमार यांच्यासमोर झाली. सुनावणीवेळी दोन्ही गटांकडून आपापल्या बाजू मांडण्यात आल्या. यादरम्यान, सुशीलचे वकील सिद्धार्थ लूथ्रा आणि आर.एस. जाखड़ यांनी त्याचा हवाला देत म्हटले की – मी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एथलिट आहे. मला पद्मश्रींसह देशातील सर्व प्रतिष्ठित पदके आणि सन्मान मिळालेले आहेत. ऑलिम्पिकमध्येही मी दोनदा पदक जिंकले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, मला ज्यूनिअर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी मला छत्रसाल स्टेडियममध्ये ठेवण्यात आले असून मी तेथे माझ्या कुटुंबासमवेत राहतो.सुशीलच्या हवाल्याने त्यांच्या वकिलाने सांगितले की, माझा या प्रकरणात काहीही संबंध नसताना विनाकारण गुंतवले जात आहे. एफआयआरमध्ये ज्या व्यक्तीने गुन्हा दाखल केला त्याची नोंद नसल्याचे सुशीलच्या वकीलाने सांगितले. सोनू नावाची व्यक्ती हिस्ट्रीशीटर असून एफआयआरमध्ये त्याच्या मागील गुन्ह्यांविषयी माहिती नाही. माझा पासपोर्ट जप्त केला आहे. माझ्या बंदुकीतून कोणत्याच प्रकाराचा गोळीबार झाला नाही व मी मृतकाला मारलेही नाही. त्यामुळे या प्रकरणात माझ्यावर खुनाचा आरोप कसा झाला हे मला माहिती नाही.

संपूर्ण प्रकरण काय आहे?
छत्रसाल स्टेडियममध्ये 4 मे रोजी मध्यरात्री कुस्तीपटूंच्या दोन गटात वाद होत मारहाण झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना स्टेडियमच्या पार्किंग क्षेत्रात मध्यरात्री 1.15 ते 1.30 दरम्यान घडली असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तेथे 5 वाहने उभी असल्याचे आढळले.

दरम्यान, या झालेल्या मारहाणीत सागर धनखार (वय 23), सोनू महल (वय 37) आणि अमित कुमार (वय 27) आणि इतर दोन कुस्तींपटू गंभीर जखमी झाले. तर उपचारादरम्यान, सागर यांचा मृत्यू झाला होता. मृतक सागर हा माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन आणि दिल्ली पोलिसातील हेड कॉन्स्टेबल यांचा मुलगा होता. तर दुसरीकडे सोनू महल हा गुंड जथेडीचा सहकारी असून यापूर्वी त्याला खून आणि दरोडा प्रकरणात अटक करण्यात आली होती.

कशाबद्दल वाद झाला होता?
सांगण्यात येते कि,, मृत सागर आणि त्याचे मित्र ज्या घरामध्ये राहत होते ते घर खाली करण्यासाठी सुशील हा सागरवर दबाव आणत होता. त्यामुळे याचे भांडणात रुपांतरण झाले. ज्यामध्ये सागरला आपले प्राण गमवावे लागले होते.

पोलिसांकडून अनेक ठिकाणी छापेमारी
सुशील अटक करण्यासाठी पोलिसांनी दिल्ली-एनआरसीसह शेजारच्या अनेक राज्यांत छापेमारी केली. परंतु, पोलिसांना अद्यापही सुशील पकडण्यात यश आले नाही. पोलिसांनी या प्रकरणात सुशीलच्या सासर्‍यासह कोच सतपाल आणि कुटुंबातील सदस्य आणि ओळखीच्या लोकांचीही चौकशी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात

कोच नं सी 15 रुळावरून घसरला पुणे-वंदे भारत एक्स्प्रेसला आज...

बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेले फ्लॅट सिल: ३ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे-पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी...

उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात शाळेला सुट्टी म्हणून मुले खुश असतात. फळांच्या राजाचा...