किरीट सोमय्यांच्या घरी पोलिस दाखल, चौकशीसाठी उद्या हजर राहण्याचे समन्स, सोमय्यांच्या कार्यालयाचीही झाडाझडती

Date:

मुंबई -कालच न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. आज नील याचाही जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला , त्यामुळेआज किरीट सोमय्यांच्या घरी पोलिस दाखल झाले आहेत. INS विक्रांतप्रकरणी चौकशीसाठी उद्या पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी पोलिसांनी घरी समन्स बजावले असून याबाबतची नोटीसही देण्यात आली आहे. या नोटीशीनंतरही किरीट सोमय्या पोलिसांसमोर हजर न झाल्यास त्यांना फरार केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमय्यांसमोरील अडचणी आता वाढताना दिसत आहे.

किरीट सोमय्या व नील सोमय्याही अजून भूमिगत आहेत. अशातच आज आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी किरीट व नील सोमय्या यांच्या कार्यालयावरही धाड टाकली आहे. तेथे अधिकाऱ्यांकडून कार्यालयातील कागदपत्रे तपासली जात आहे. या कारवाईबाबत पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. INS विक्रांत प्रकरणी सोमय्यांविरोधात दाखल गुन्ह्यावर पुढील कारवाई करण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याशिवाय सोमय्यांच्या कार्यालयातही उद्या चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या आज व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. ट्विटरवर व्हिडिओ जारी करत आपल्याविरोधात कितीही आरोप केले तरी आपण दबणार नाही. महाविकास आघाडीचे घोटाळे बाहेर काढतच राहू, असे त्यांनी म्हटले आहे. तसचे, INS विक्रांतला वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीबाबत उच्च न्यायालयात सर्व माहिती देऊ, असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, आपण सध्या कुठे आहोत याची माहिती त्यांनी दिली नाही.


SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...