पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने बांधकाम परवानगी प्रक्रिया सुलभ
व पारदर्शक करण्यासाठी संगणकीय बांधकाम परवानगी प्रणाली (Online Building Plan Approval System)
करिता मदत कक्ष (हेल्प डेस्क) दि.२७ जून २०१८(बुधवार)पासून कार्यान्वित करण्यात आला आहे. सध्या एक इमारत
असेलेले गृहप्रकल्प व सर्व औद्योगिक बांधकाम परवानग्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.
संगणकीय बांधकाम परवानगी प्रणाली कार्यशाळा दि. २६ला जूनला (मंगळवारी) सकाळी १० ते २ या वेळेत औंध
येथील पंडीत भीमसेन जोशी सभागृहात पार पडली. बांधकाम परवानगी प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने उपस्थित
विकसक, सर्वेक्षक व वास्तूविशारदांना समजावून सांगण्यात आली. हेल्प डेस्क उदघाटनावेळी प्राधिकरणाचे महानगर
आयुक्त श्री किरण गित्ते, महानगर नियोजनकार श्री. विजयकुमार गोस्वामी, बांधकाम नियंत्रक प्रमुख सारंग आवाड,
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती विद्युत वरखेडकर, प्रशासन
अधिकारी अर्चना तांबे, क्रेडाईचे डी. के. अभ्यंकर, आर्कीटेक्ट कपिल जैन, विंझास सोलुशनचे प्रशिक्षक प्रतिनिधी आदि
उपस्थित होते. यावेळी संगणकीय बांधकामप्रणाली प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले.
बांधकाम परवानगी नकाशे व बँक चलन हे डिजिटल स्वाक्षऱ्या करून प्रदान करण्यात येतील व इतर माहिती ई-मेल
आणि मोबाईलवर दिली जाईल. या प्रणालीमध्ये ‘कलर-कोडींग स्कीम’चा वापर केला गेला आहे, ज्यामुळे
वास्तुविशारदांना नकाशे बनविणे अतिशय सोपे होईल. OBPAS द्वारे सर्व चलन ऑनलाईन पद्धतीने भरता येतील.
प्राधिकरणाच्या अस्तित्वात असलेला जमीन वापर (Existing Land Use) प्रणालीशी या नवीन बांधकाम परवानगी
प्रणालीला जोडण्यात आले आहे. तसेच अग्निशमन विभागाच्या नाहरकती देखील एकत्रित करण्यात येणार आहेत.
यावेळी प्राधिकरण आयुक्त किरण गित्ते म्हणाले, “पीएमआरडीए कार्यलयात संगणकीय बांधकाम परवानगी प्रणालीसाठी
मदत कक्ष उपयुक्त ठरेल. ऑनलाइन बांधकाम परवानगी प्रक्रिया सुलभ आहे. या संगणकीय बांधकाम परवानगी
प्रणालीकरीता 'www.pmrda-obpas.com' हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. नागरिकांच्या माहितीसाठी
कार्यलयात माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच शंका निरसनासाठी ०२०-२५९३३३०० हा क्रमांक सुरु
करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या ऑनलाईन प्रणालीचा वापर करावा. अमेय देशपांडे यांनी
कार्यक्रमाचे संयोजन केले.