Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन सेवेस गती

Date:

पुणे-अग्निशमन सेवा ही जीवीत व वित्त हानी संरक्षणासाठी अत्यावश्यक सेवा आहे.
अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी आणि जीव संरक्षण ही अग्निशमन विभागाची मुख्य
उद्दीष्ट्ये असून महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक अधिनियम २००६ च्या कलम २१नुसार पुणे
महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात अग्निशमन यंत्रणा विकसित करून निवासी, व्यावसायिक आणि
औद्योगिक अग्निसुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे.


पहिल्या टप्प्यात मौजे वाघोली, तालुका हवेली येथे अद्यावत वाहनांसह सुसज्ज अशा अग्निशमन केंद्राची
उभारणी करण्यात येत असून या अग्निशमन केंद्रात कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारतीसह किमान ३
अग्निशमन वाहनांसाठी गॅरेज व कार्यालयीन इमारतीचे बांधकाम सुरु असून मेसर्स सिनर्जी एसकेआय
इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांच्याकडून हे बांधकाम करण्यात येत आहे. या अग्निशमन केंद्रासाठी अदयावत अशा
अग्निशमन वाहनांच्या बांधणीचे काम सुरु असून नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत हे अग्निशमन केंद्र
कार्यान्वित होईल. या अग्निशमन केंद्रासाठी सुमारे १५ कोटी खर्च येणार आहे.
त्याचबरोबर प्राधिकरण क्षेत्रातील एकात्मीक वसाहतींनी विकसित केलेली अग्निशमन केंद्र (i) नांदेड सिटी
मौजे. नांदेड, ता. हवेली (ii) ब्लू- रिज मोजे- हिंजवडी, ता. मुळशी (iii) कोलते पाटील मौजे मारुंजी ता.
मुळशी हि ३ अग्निशमन केंद्र पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत कार्यान्वित करण्यात येत आहे.
या अग्निशमन केंद्रामध्ये आग विझविणे व विमोचन करण्यासाठी ५५ मीटर उंच शिड्या असणाऱ्या एकूण ३
गाड्यांचा ताफा उपलब्ध होणार असून प्रत्येक अग्निशमन केंद्रासाठी किमान ३० कर्मचारी २४ x ७ तत्वावर
कार्यरत राहणार आहेत. ही ०४ अग्निशमन केंद्र मिळून किमान पंचवीस किलोमीटरच्या परिघातील किमान
०६ लाख लोकसंख्या आणि किमान ५० गावांना अग्निशमन सेवा पुरविण्यात प्राधिकरणास यश येईल अशी
माहिती पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली आहे.
प्राधिकरण क्षेत्रातील जलदगतीने होणारा नागरी व औद्योगिक विकास लक्षात घेऊन नागरिकांना व
उद्योगांना संरक्षण देण्यासाठी अद्यावत सेवा पुरविण्यास प्राधिकरण कटिबध आहे, असे पीएमआरडीएचे
महानगर आयुक्त किरण गित्ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हक्काचे केंद्र -ना. चंद्रकांतदादा पाटील

पाषाण-सुतारवाडीतील नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पुणे:नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय...

अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या हॉटेल चालकासह 4 जणांवर गुन्हा दाखल

पुणे:साळुंखे विहार रस्त्यावर अवैधरित्या तंबाखुजन्य हुक्का पार्लरचा पर्दाफाश करण्यास...

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट

शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदतीची ग्वाही नांदेड दि.११ :- देगलूर तालुक्यातील तमलूर...

भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अभ्यासक्रमांची घोषणा

पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने शैक्षणिक...