पुणे- २०१७ च्या महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने रणशिंग फुंकले असून येत्या ९ ते ११ मार्च दरम्यान तीन दिवसीय मेळावा त्यासाठी आयोजित केला आहे . आज या मेळाव्याची घोषणा शिवसेनेचे शर्प्रमुक माजी आमदार विनायक निम्हण यांनी येथे केली .
पुण्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सोळशी येथील वेदी रिसोर्ट वर ‘शिवतेज ‘ नावाने हे शिबीर होईल . ज्याचे उद्घाटन उद्धव ठाकरे करतील . यावेळी आकाशात भगवे फुगे सोडणे , महाराष्ट्र गीत सदर करणे असा तुफानी कार्यक्रम आयोजीय करण्यात आला असून यावेळी विजय शिवतारे , नीलम गोऱ्हे , शशिकांत सुतार,डॉ. अमोल कोळे आदी मान्यवर उपस्थित राहतील .
याच ठिकाणी निवास भोजन व्यवस्था सकाळी योगा , प्राणायाम त्यानंतर नेत्यांची -कार्यकर्त्यांची भाषणे मनोगते- परिसंवाद असे कार्यक्रम होणार आहेत . विशेष म्हणजे विविध विषयावर पुण्यातील अराजकीय अशा मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत . यामध्ये सलाम पुणे पुरस्कारप्राप्त पत्रकार संभाजी पाटील , सलाम पुणे पुरस्कार प्राप्त असे समाज प्रबोधक-राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी , या शिवाय विवेक वेलणकर , वंदन नगरकर , प्रवीण वाळिंबे, शिवरत्न शेटे , योग शिक्षक रुपेश थिटे , आदी मान्यवरांचा समावेश आहे .