पुणे- कोरोना संकटा च्या पार्श्वभूमीवर काम ,रोजी रोटी बंद झाल्याने बेघर,बेरोजगार झालेल्या सुमारे ७४९ नागरिकांना पुणे मनपाच्या शाळा,रात्रनिवारा ( night shelter ) मधून निवारा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे,त्याचबरोबर अंथरून पांघरून उपलब्ध करून देण्यात आले आहे,
या नागरिकांकरिता चहा,नाष्टा, जेवणाची व्यवस्था क्षेत्रीय अधिकारी स्थानिक कार्यकर्ते,स्वयंसेवी संस्था यांच्या साहाय्याने करीत असल्याचे समाजविकास विभागाचे उपायुक्त सुनील इंदलकर यांनी कळविले आहे.