मिळकतकर भरणारांचा विमा उतरविणारी कंपनी कोणाची ?
पुणे- महापालिका प्रत्येक मिळकतकर वेळेत भरणाऱ्यांचा ५ लाखाचा अपघाती विमा उतरविते . पण नेमकी हि कंपनी कोणाची आहे ? कोणाच्या मार्फत महापालीकेपर्यंत पोहोचलेली आहे याचा शोध घेण्यात यावा अशी मागणी आता होवू लागली आहे.
पुण्यातील आपल्या मिळकतीचा कर वेळेत भरणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा ५ लाख रुपये भरपाई देणारा अपघाती विमा उतरविला जातो . मृत्यू झाल्यास ५ लाख आणि अपंगत्व आल्यास काही रक्कम असे त्याचे स्वरूप आहे. खरे तर हि योजना आणणाऱ्या स्थायी समितीने अत्यंत चांगल्या हेतूने आणली . पण या मागे ठराविक खाजगी विमा कंपनीचे उखळ पांढरे करण्याचा डाव एका राजकीय नेत्याचा होता अशी माहिती आता पुढे येवू लागली आहे . नेमके यात खरे खोटे समजण्यासाठी प्रशासनाने याबाबत ची माहिती जाहीर केली पाहिजे म्हणजे अशा चर्चा जर अफवा असतील तर त्या थांबतील असेही म्हणणे मांडले जाते आहे . सरकारी विमा कंपन्या असताना त्याच्याकडूनच विमा उतरविला पाहिजे . ज्याप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेतच महापालिकेच्या रकमा ठेवी म्हणून ठेवल्या जातात तशीच कार्य पद्धती याबाबत का अवलंबली नाही असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय .मिळकत कर धारकाच्या बिलावर आणि पावतीवर त्यास कोणत्या कंपनीचा कोणत्या स्वरूपाचा विमा प्राप्त आहे याचा उल्लेख देखील करणे जरीरीचे असल्याचे म्हणणे मांडले जाते आहे.