पुणे-केवळ आपल्या विरोधातल्या राजकीय पक्षाचे आहेत म्हणून सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना डावलून त्यांचे फोटो दूरवर ढकलून पुणे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांनी आपल्या संकुचित वृत्तीचे दर्शन हे अंदाजपत्रक सादर करताना पुणेकरांना करविले आहे अशी टीका आता होवू लागली आहे. मुख्यमंत्र्यानंतर प्रोटोकोल नुसार उपमुख्यमंत्री -पालकमंत्री यांचा फोटो अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेत टाकणे बंधनकारक असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनंतर लगेचच विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो टाकला . आणि नंतर काही फोटो पुढील पानावर टाकल्यावर दुसऱ्या पानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो टाकला . यावरून त्यांची संकुचित वृत्ती जाहीर झाल्याची टीका होवू लागली आहे.
या प्रकरणी महापालिकेतील विपक्ष नेत्या दिपाली धुमाळ , कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे ,माजी महापौर प्रशांत जगताप यांनी या संकुचित वृत्तीचा निषेध करीत तातडीने या पुस्तिकेत बदल करणारी छपाई करण्याचे आदेश दिल्याबद्दल महापौरांचे आभार मानले आहेत … पहा आणि ऐका नेमके ते काय म्हणालेत …