अग्निशमन दलाच्या पहिल्या प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन
पुणे- चांदणी चौकाजवळ अग्निशामक केंद्राबरोबर अग्निशमनचे काम करणाऱ्या जवानांना प्रशिक्षण देणारे पहिले केंद्र सव्वा दोन कोटी रुपये खर्च करून उभारले जाते असून काल या केंद्राच्या इमारतीच्या आणि संपूर्ण प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले.यावेळी या केंद्राबाबत आणि प्रशिक्षण केंद्राबद्दल ची माहिती ,या कामासाठी पुढाकार घेणारे नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली . पालक मंत्री ,तसेच महापौर मुक्ता टिळक ,आमदार भीमराव तापकीर,नगरसेवक अल्पना वर्पे,श्रद्धा प्रभुणे ,किरण दगडे पा. मुरलीधर मोहोळ आणि आयोजक वेडे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सुमारे दीड एकर जागेत हा प्रकल्प येथे होत असून ,हि जागा उपलब्धी साठी २ वर्षाचा अवधी लागला. गेल्यावर्षी याकामासाठी अवघ्या १ लाख ६५ हजाराचे टेंडर काढण्यात आले नंतर ते रद्द करण्यात आले . अखेर या वर्षी भरीव तरतूद करण्यात आली .अग्निशमनाचे काम करणाऱ्या ५ गाड्यांचे येथे केंद्र असेल आणि २लाख ६५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी येथे उभारली जाईल . या शिवाय प्रशिक्षण केंद्र , गाड्या दुरुस्ती केंद्र , व्यायाम शाळा ,स्टोर रूम,निवास आणि भोजन व्यवस्था यांचा समावेश या प्रकल्पात असेल दीड एकर जागेत अवघा १७ टक्के चटइ क्षेत्र बांधकामासाठी वापरून ते उभारले जाईल .अशी माहिती यावेळी दिलीप वेडे पाटील यांनी दिली .