पुणे- येवलेवाडी विकास आराखडा आज महापालिकेच्या मुख्य सभेत सादर झाला आणि नियोजन समितीच्या सर्व म्हणजे ४६९ गुंठ्यावरील निवासी विभागाची शिफारस धुडकावून लावून शहर सुधारणा समितीने केलेलाच आराखडा भाजपने बहुमताने संमत केला .
या मुळे भाजपने येवलेवाडी विकास आराखडा प्रकरणी एक पाऊल मागे घेतल्याचे मानले जाते .दरम्यान या प्रकरणी मनसे गटनेते वसंत मोरे म्हणाले कि , सोशल मिडिया मुळे नियोजन समितीचे पानिपत करण्यात यश आले आहे. पण अजून खरी लढाई आपल्याला लढायची आहेच . शहर सुधारणा समितीने १५७७ गुंठे जागा डोंगर माथा डोंगर उतार क्षेत्रातून रहिवासी विभागात समाविष्ट केली आहे याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत,आणि पुढे लढा सुरूच ठेवणार आहोत ..ऐका आणि पहा यावेळी वसंत मोरे काय म्हणाले …