पुणे-विरोधात असताना काही कामे झाली नाही तर त्याविरोधात आंदोलन तरी करता येत होते. पण आता नगरसेवक होऊनही आमची कामे होत नाहीत. प्रशासनच साथच देत नाही, अशी खंत सत्ताधारी भाजप पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सर्वसाधारण सभेत व्यक्त केली.
बालवडकर म्हणाले, “प्रभागातील नागरिक त्यांचे प्रश्न घेऊन आमच्याकडे येतात, आम्ही त्यांना आश्वासने देतो. नागरिकांचे प्रश्न घेऊन आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत असताना प्रसाशन साथच देत नसेल तर आम्ही करायचे काय? अधिकारीवर्ग पहिल्या बाकावर बसणाऱ्यांचेच ऐकतात. त्यांचीच कामे होतात. असे होत असेल तर आम्ही नगरसेवक होऊन चूक केली का?”असा प्रश्न उपस्थित करत बालवडकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या घरचा आहेर दिला