पुणे- महापालिकेत सर्वाधिक काळ आयुक्त म्हणून काम पाहणाऱ्या कुणाल कुमार यांची नुकतीच केंद्रात गृहनिर्माण विभागाच्या सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांनी आपल्या आयुक्तपदाचा पदभार अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्याकडे सोपवला आहे.विभागीय आयुक्त पदावरून चंद्रकांत दळवी निवृत्त झाल्यानंतर त्यांचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी सौरभ राव सांभाळीत आहेत . हे पाहता आता पुणे विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त अशा दोन वरिष्ठ आणि महत्वपूर्ण पदावर शासनाने अद्याप कोणाच्याही नियुक्त्या केल्या नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .
कुणाल कुमार यांच्या कार्यकाळात नदी सुधार प्रकल्प, चोवीस तास समान पाणी पुरवठा, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि केबल डक्ट हे विषय खूप गाजले.या विषयांवर आक्षेप घेण्यात आले पण या सर्वांवर नेहमीच महापालिका आयुक्तांनी मात केल्याचे दिसून आले. आता त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती केली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.