अखेर ५ रस्त्यांवर १४ तासासाठी ‘जिझिया कराचा ‘ प्रवेश (व्हिडीओ)

Date:

पुणे- संपूर्ण शहर आणि उपनगरे काबीज करायला निघालेल्या जिझिया कराचा(पार्किंग शुल्क) शहरातील ५ रस्त्यांवर १४ तासासाठी प्रवेश झाला आहे . पार्किंग प्रस्तावाला प्रस्तावाला तीव्र विरोध झाल्यानंतर संपूर्ण शहराऐवजी पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर पे अ‍ॅण्ड पार्क योजना राबविण्याचा निर्णय महापालिकेच्या मुख्य सभेत आज पाहते दीड वाजता भाजपच्या  बहुमताने घेण्यात आला.दुपारी चार वाजता सुरु झालेल्या मुख्य सभेत जाणीवपूर्वक हा प्रस्ताव रात्री साडेनऊ वाजता पुकारला गेला . विरोधकांची १७ मते झुगारून भाजपची ५८ मते घेवून या जिझिया कराने ५ रस्ते अखेर दिवसासाठी काबीज केली आहेत .उपमहापौर सिद्धार्थ धेंडे आणि नगरसेवक सुनील कांबळे यांनी महापालिका हद्दीतील सर्वच रस्ते काबीज करू पाहणाऱ्या पार्किंग प्रस्तावावर हि उपसूचना देत मात केली .या उपसूचनेसह प्रस्ताव मंजूर झाल्याने संपूर्ण पालिका हद्दीतील पार्किग शुल्काचा प्रस्ताव तूर्तास समितीचा ६ महिन्यानंतर  अहवाल येईपर्यंत तरी टळला आहे.

  या उपसूचनेनुसार नुसार पार्किंग शुल्काच्या दरनिश्चितीसाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकारी आणि सर्वपक्षीय गटनेत्यांची समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला असून दिवस-रात्र पार्किंग ऐवजी फक्त दिवसा शुल्क आकारणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

पार्किंग धोरणाचा अभ्यास करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकारी आणि सर्वपक्षीय गटनेत्यांची समिती नेमावी. या समितीने काही बाबींचा अभ्यास करून सहा महिन्यात अहवाल द्यावा, ही उपसूचना मुख्य सभेत मान्य करण्यात आली. महापालिकेने गेल्या २० वर्षांत आरक्षित केलेल्या पार्किंगच्या जागा, त्यांचे विकसन यांचा आढावा घ्यावा, ताब्यात आलेल्या पार्किंगच्या जागांवर बहुमजली पार्किंग विकसित करण्याचा अहवाल तयार करावा, पार्किंगच्या जागा बीओटी तत्त्वावर विकसित करण्याबाबत अभ्यास करावा, पार्किंग शुल्कातून मिळणारे उत्पन्न पार्किंग व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर खर्च करावे, या बाबींवर ही समिती काम करणार आहे.

संपूर्ण शहरातील  या धोरणाअंतर्गत रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांकडून शुल्क आकारणी प्रस्तावित होती. त्यानुसार दुचाकी गाडय़ांसाठी प्रतितास किमान दोन ते कमाल चार रुपये शुल्क, तर चारचाकी गाडय़ांना प्रतितास किमान १० ते कमाल २० रुपये शुल्क आकारणी करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली होती . याशिवाय रात्रीही रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या गाडय़ांकडून शुल्क आकारणी करण्याचा प्रस्ताव होता.

या निर्णयाच्या विरोधात शहरात तीव्र पडसाद उमटले आणि सत्ताधारी भाजपवर टीका सुरू झाली. महापालिका आयुक्त आग्रही असलेल्या या धोरणाला मुख्य सभेची मंजुरी घेण्यासाठी शुक्रवारी मुख्य सभेपुढे हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. विरोधामुळे सत्ताधारी भाजपने दोन पाऊले मागे येत काही उपसूचना दिल्या. त्यानुसार शहरातील सर्व रस्त्यांच्या ऐवजी पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यास मंजुरी दिली.

माय मराठी ने सर्वात प्रथम या प्रस्तावाला विरोध करत त्यास जिझिया कर असे नाव दिले . भाजपच्या शहराध्यक्ष यांचा अशा प्रस्तावाला विरोध असताना त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झाला . शहरातील काही स्वयंसेवी संघटना ,आणि काही उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करत हा कर तमाम ३५ लाख वाहनांवर लादण्याचा प्रयत्न विशिष्ट माध्यमांनी केला. त्यामुळे विरोधी पक्ष आणि शहरातील अन्य  संघटनांनी थोडा उशिरा ..पण जोरदार विरोध अखेरच्या टप्प्यात केला .आणि या प्रस्तावाची तीव्रता लक्षात घेवून भाजपमधील काही नगरसेवकांनी देखील अंतर्गत पक्ष पातळीवर या प्रस्तावाला विरोध असल्याचे निदर्शनास   आणून दिले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...