पुणे – महापालिका भवनातील मिळकतकर विभागात अनधिकृतपणे काम करणारा एक तोतया कर्मचारी बुधवारी काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक अविनाश बागवे यांनी मायमराठी च्या माध्यमातून रंगेहाथ पकडला याबाबत आज पालिकेच्या मुख्य सभेत शिंदे यांनी याप्रकरणी आवाज उठविला आणि हे प्रकरण गंभीर असून कडक करवाईची मागणी केली या बाबत खुलासा करताना आयुक्त कुणाल कुमार यांनी संबधीत व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.
पुणे महापालिका भवनातील मिळकतकर कार्यालयात गेल्या काही वर्षांपासून महेश सुराणा नावाचा पालिकेचा कर्मचारी असल्याचे भासवून गणेश लाड यांच्या जागेवर बसून विभागासंबंधीची कामे करत होता. हा इसम पालिकेबरोबर तो नागरिकांची देखील फसवणूक करत होता हा प्रकार मायमराठी कडून समजल्यानंतर काँग्रेसचे गटनेते अरविद शिंदे आणि अविनाश बागवे यांनी थेट मिळकतकर कार्यालय गाठले.त्यानंतर मिळकतकर विभाग प्रमुख सुहास मापारी यांच्याकडे या कर्मचाऱ्याला स्वाधीन केले. याबाबत आज झालेल्या मुख्यसभेमध्ये अरविंद शिंदे यांनी हा प्रकार सभागृहाच्या निदर्शनास आणून देऊन त्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली तसेच महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले.
याबाबत खुलासा करताना आयुक्त कुणाल कुमार यांनी संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले तसेच याप्रकरणावर मुख्य लेखापाल अंबरीश गालिंदे यांच्या मार्फत चौकशी समिती नेमून त्याचा अहवाल तीन आठवड्यात सभागृहापुढे ठेवणार असल्याचे त्यानी सांगितले