Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणेकरांच्या १० कोटीवर खुलेआम डल्ला .. विरोधक हतबल

Date:

पुणे :कात्रज च्या जवळील काही गावांच्या राजकारणावरून महापालिकेच्या मुख्य सभेत पुणेकरांच्या पैशातून राजकीय डावपेच खेळण्याचे कारभार सुरु असल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा परिणाम म्हणून पुणेकरांच्या तिजोरीतून काल १० कोटीचा डल्ला मारण्यात आला .दरम्यान सुभाष जगताप यांनी तर यास मुख्य सभेतच हा दरोडा असल्याचे स्पष्ट वक्तव्य केले आहे  .दरम्यान खरे तर हद्दीबाहेरच्या गावांमधील  बेकायदा बांधकामे करणाऱ्यांसाठी हे १० कोटी वापरले जाणार आहेत. तेथील बांधकामांना या पैशातून ड्रेनेज लाईन फुकटात मिळवून दिली जाणार आहे . यामुळे येथील बांधकामांचे दर हि वाढणार आहेत . पण हे सारे केवळ राष्ट्रवादी आणि मनसे च्या नगरसेवकांना बदनाम करून पुढील निवडणुकीच्या दृष्टीने मतांचे राजकारण करण्यासाठी होते आहे हे दुदैव आहे . अर्थात याबाबत राजकीय दृष्टीने न राष्ट्रवादी आणि मनसे यांनी प्रस्तावाला पाठिंबाच दिला आहे .

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतगेल्या काही दिवसांपूर्वी या ग्रामपंचायतींना दहा कोटी रुपये देण्याचा भाजपचा प्रस्ताव बहुमत असतानाही गुंडाळला गेला होता . अर्थात त्यावेळी नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला नव्हता . पण काल मात्र मुस्कटदाबी सहन करीत भाजप सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान करून तो संमत केला .

 महापालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि भाजपच्या नगरसेविका मनिषा कदम यांचे पती राजाभाऊ यांच्यातील राजकीय सख्य आणि वैर आता जगजाहीर झाले आहे .. गेली दहा वर्षे मोरे आणि कदम कात्रज परिसरात मनसेच्या झेंड्याखाली एकत्रित काम केले. पण, गेल्या दीड-पावणेदोन वर्षांपूर्वी मोरे आणि कदम यांच्यातील मैत्रीला ग्रहण लागले अन त्याची परिणिती वैयक्तिक वादात झाली. हा वाद वैयक्तिक पातळीपुरता न राहाता, राजकीयही झाला. कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या पत्नीला निवडणुकीतून नगरसेवक म्हणून सभागृहात पोहोचविले . . काही महिन्यांपूर्वी मोरे आणि कदम समर्थकांत जोरदार वाद झाला आणि तो पोलिस ठाण्यापर्यंत पोचला. त्यावरून मोरे आणि कदम यांच्यासह समर्थकांत वादाच्या ठिणग्या झडत होत्या.अशा परिस्थितीत महापालिका हद्दीबाहेरील मांगडेवाडी, भिलारेवाडी, निंबाळकरवाडी येथून कात्रज तलावात येणारे मैलापाणी रोखण्यासाठी दहा कोटी रुपयांच्या सांडपाणी वाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव मनिषा कदम यांनी मांडला .   महिन्यांपूर्वी प्रस्ताव सभेत आला तेव्हा कात्रज तलावाच्या कामाकडे दुर्लक्ष करीत हद्दीबाहेरील गावांना एवढा निधी देण्यास मोरे यांनी विरोध केला. त्यामुळे या प्रस्तावावर मतदान झाले. त्यावेळी मोरेंनी विरोधात तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

हा प्रस्ताव शुक्रवारी पुन्हा सभेत आणण्यात आला, विषयाला फारसा विरोध न करता मोरे यांनी उपसूचना मांडत, कदम यांच्या प्रस्तावातील दहा कोटींमूधन दोन कोटी रुपये कात्रज तलावाच्या कामासाठी मागितले. तेव्हा `हा प्रस्ताव लोकांच्या मागणीनुसार मांडला आहे. मात्र, काही मंडळी राजकीय द्वेषापोटी कामात खोडा घालत आहेत. कामे अडविण्याचा जाणीपूर्वक प्रयत्न ते करीत आहेत. ते योग्य नाही,’ अशा शब्दांत नगरसेविका मनिषा कदम यांनी मोरेंवर हल्ला केला. त्यानंतर मोरे यांनी आपली बाजू मांडली आणि कदम यांचे आरोप खोडून काढले. “विकामसकामात राजकारण केले नाही, करणार नाही. तरीही, माझी बदनामी होत असेल तर, वसंत मोरे यांची दोस्ती बघितली आता, दुश्‍मनी बघाल’ असा दमच मोरे यांनी भरला.

यावेळी मोरे यांनी केले भाषण पहा आणि ऐका त्यांच्याच शब्दात ….

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...