उद्या महापालिकेवर मुस्लीम समाजाचा मोर्चा
पुणे- पालकमंत्री गिरीश बापट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे पुढे करून महापालिकेतील सत्ताधारी शिवसृष्टीला खो घालीत असून या विरोधात भाजप पदाधिकारी यांच्या निषेधार्थ मुस्लीम समाजाचा उद्या महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे .
नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी या मोर्चाची हाक दिली असून ,उद्या दुपारी 1 वाजता महापालिकेवर हा मोर्चा धडकणार आहे .अशा पद्धतीने शिवसृष्टीसाठीमुस्लीम समाजाने महापालिकेवर मोर्चा काढणे हि बाब वैशिष्ट्यपूर्ण मानली जाणार असून आतापर्यंत महापौर मुक्ता टिळक यांनी आणि पालकमंत्री बापट यांनी शिवसृष्टीला का टाळले ? या प्रश्नावर आता राजकीय खलबते होण्याची वेळ आली आहे .
माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी अनेक वेळा शिवसृष्टीसाठी महापालिकेच्या मुख्य सभेत निर्वाणीचा इशारा दिला ,पण प्रत्येक वेळी बापट -टिळक यांनी त्यांची समजूत काढून वेळ मारून नेली . आता या वेळेचा अपव्यय झाल्याचे आणि मानकर यांची हि दोघे कायम फसवणूक करत आल्याचे स्पष्ट झाले आहे . या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अगर कॉंग्रेस पक्ष आणि शिवसेना काय भूमिका घेणार हे आता पाहावे लागणार आहे .