पुणे- महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेली मागणी पुणे पोलिसांनी मान्य केली असून अत्यावश्यक सेवेसाठी आता सकाळी १० ते दुपारी २ अशी वेळ वाढवण्यात आली असून याची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. या संदर्भात पुणे पोलिसांशी कालच चर्चा झाली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.असे महापौर यांनी सांगितले तर तसा आदेश पोलीस अधिकारी रवींद्र शिसवे यांनी काढला आहे