Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्यात 55.53 टक्के मतदान

Date:

पुणे – महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या मतदानात १४ लाख १० हजार ९७४ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. हे प्रमाण एकूण मतदारांच्या ५५.५० टक्के ऐवढे आहे. यामध्ये शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या शनिवार व सदाशिव पेठेत सर्वाधिक मतदान झाले आहे. विमाननगर-सोमनाथनगर प्रभागात सर्वात कमी म्हणजे ४५.९४ टक्के मतदान झाले.

दरम्यान आपापल्या घराजवळच्या मतदान केंद्रांवर कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींबरोबर हजेरी लावली, हडपसर, सातववाडी, गोंधळेनगर, मुंढवा, मगरपट्टा सिटी, कोरेगाव पार्क आणि घोरपडी परिसरातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हडपसर क्षेत्रीय कार्यालयातर्गंत तिन्ही प्रभागांमधील कोरेगाव पार्कचा अपवाद वगळता सर्व केंद्रांवर सकाळी मतदारांच्या रांगा होत्या. या भागांत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत साधारणत: 50 टक्के मतदान झाले. हडपसर परिसरातील दोन मतदान केंद्रांबाहेर गोंधळाच्या घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मुंढव्यात एका मतदान केंद्रावर मतदान यंत्रात किरकोळ बिघाड झाल्याने गोंधळ झाला. त्यानंतर लगेचच मतदान सुरळीत सुरू झाले.

हडपसर गावठाण-सातववाडी (प्रभाग क्र. 23), मुंढवा-मगरपट्टा सिटी (प्रभाग 22) आणि कोरेगाव पार्क-घोरपडी या प्रभागांकरिता सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. तेव्हापासून या केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नवमतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बहुभाषिक मतदार असलेल्या कोरेगाव पार्कमधील केंद्रांवर मात्र मतदारांचा फारसा उत्साह दिसून आला नाही. दुसरीकडे, त्या-त्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नागरिकांना मतदानासाठी केंद्रावर आणण्यासाठी घरोघरी जात होते. माजी महापौर वैशाली बनकर, चंचला कोद्रे, राजलक्ष्मी भोसले यांनी सकाळीच आपल्या कुटुंबीयांसह मतदान केले. पाठोपाठ माजी उपमहापौर बंडू गायकवाड, चेतन तुपे यांनी मतदान केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढवावा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे उद्घाटन‘केअर’, ‘क्युअर’ व ‘हील’ तत्वांशी...

दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप च्या पुनरागमनाची चाहूल

पुणे- दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप...

रसिकांची दाद कलाकारांना सुखावते : पं. सुहास व्यास

पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कलाकारांचा गौरव डॉ. श्याम गुंडावार,...

डॉ. दीपक हरके यांना अमेरिका, बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची ॲानररी डॅाक्टरेट

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते सन्मानित पिंपरी, पुणे...