Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बायमायनिंग प्रक्रिये नंतर २५ ते ३० टक्के जागा मुळ मालकांना परत देण्याचा विचार ..कचरा -आराखडा राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Date:

 

पुणे-

पुण्यातील कचराकोंडी सोडविण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्याचे महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण केले आणि याच्या अंमलबजावणी संदर्भात चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आयुक्त आणि महापौरांना महापालिका स्तरावर या आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

या बैठकीत महानगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये ज्या नागरिकांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे. तसेच कचरा डेपो परिसरात साठलेल्या कच-यावर बायमायनिंग प्रक्रिया करून रिकाम्या    होणा-या जागेपैकी 25 ते 30 टक्के जागा मूळ मालकांना परत  देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केल्याचे सांगण्यात आले आहे.

या आराखड्यामध्ये अल्पकालीन, मध्यम व दीर्घकालीन घनकचरा जिरवण्यासंबंधीची जनजागृती, नागरिकांचा सहभाग, कच-याचे विलगीकरण, संकलन, वाहतूक, प्रक्रिया, भविष्यात निर्माण होणा-या कच-याचे नियोजन करण्यासाठी लागणारी जमीन, त्यानुसार करावयाचे नियोजन इत्यादींचा समावेश आहे. सर्वप्रथम 25 मे रोजी प्रशासनाने महापौरांकडे हा आराखडा सादर केला होता. त्यानंतर महापौरांनी 31 मे रोजी शहरातील खासदार, आमदार, नगरसेवक, शहरातील स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी यांच्यासमोर आराखडा सादर करत त्यासंदर्भात सूचना मागवल्या होत्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कला आणि करिअर‌’ विषयावर ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’चे आयोजन

सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी-नव्या शैक्षणिक धोरणाला अनुसरून...

स्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पुणे, दि. ११: कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक...

लोणावळा परिसरात वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

पुणे, दि. ११ : जिल्ह्यातील लोणावळा परिसरात ऐतिहासिक वास्तू,...