Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सूपरस्टारने पूर्ण केली आजारी फॅनची इच्छा

Date:

1 2 4 5

 फॅनच्या प्रकृतीत आश्चर्यजनक पध्दतीने सुधार

हे कदाचित एखाद्या बॉलिवुड चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे वाटेल, पण ही एक वास्तवात घडलेली कथा आहे. एक वास्तववादी अभिनेता एका वास्तववादी कथेचा हिरो बनलेला आढळून येतो.

ऑक्टोबर २०१४मध्ये संस्था अतिशय आजारी असलेल्या मुलांच्या शेवटच्या इच्छेला पूर्ण करण्याच्या उद्देशाने काम करणा-या मेक अ विश फाऊंडेशन या खाजगी संस्थेने टॉलिवुड सूपरस्टार पवन कल्याणला संपर्क केला आणि त्यांना बी.श्रीजा नावाच्या १२ वर्षे वयाच्या मुलीच्या बद्दल सांगितले, श्रीजा ऍक्युट न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने त्रस्त असून कोमामध्ये होती. तेलंगाणा जिल्ह्यातील खम्ममच्या पलवांचा भागात इयत्ता सातवीत शिकत असलेली बंदी श्रीजा पवन कल्याणची मोठी फॅन होती आणि पवन कल्याणला पाहणे ही तिची एकमेव इच्छा होती. तिच्या कथेने पवन भारावून गेला, तो हुडहुद वादळामुळे त्रस्त झालेल्या भागांच्या भेटीसाठी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे गेला होता. श्रीजाला भेटण्यासाठी त्याने तात्काळ होकार दिला.

पवन आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री श्री चंद्राबाबू नायडू यांना १६ ऑक्टोबर रोजी वायझॅग येथे भेटला आणि त्याने वादळानंतरच्या शमनात्मक कार्यांसाठी ए पी सीएम रिलिफ फंडसाठी त्यांना ५० लाखांचा धनादेश दिला. वादळाने त्रस्त झालेल्या काही गावांना भेट दिल्यानंतर  आणि नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या लोकांचे सांत्चन केल्यावर पवन तात्काळ श्रीजाला भेटण्यासाठी रवाना झाला.

आपल्या व्यस्त कामकाजाच्या वेळातून, फट काढून पवनने १७ ऑक्टोबर २०१४ रोजी २०० किलोमीटरचा प्रवास केला आणि खम्मम येथील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये असलेल्या श्रीजाला तो भेटण्यासाठी आला, श्रीजाच्या बिछान्याच्या जवळ तो अर्ध्यातासाहून जास्त वेळ बसला. श्रीजाच्या पालकांनी तिच्या बद्दल सांगताच पवनला आपले अश्रु आवरणे कठिण झाले. श्रीजा संपूर्ण शुध्दीमध्ये नव्हती, तरी देखील पवनने तिच्या कानात सांगितले, “श्रीजा, मी पवन कल्याण आहे. मी तुला भेटायला आलो आहे.” त्याने तिला खेळणी दिली आणि तिने लवकर होण्याची प्रार्थना केली. ती बरी  झाल्यावर आपल्याला भेटायला घेऊन या असे पवनने तिच्या पालकांना सांगितले.

पवनची शिष्ठता खम्मममध्ये वणव्याप्रमाणे पसरली. कल्याणच्या भेटीची बातमी मिळताच हॉस्पिटलमध्ये लोकांच्या जमावाने त्याला घेरुन, फॅनची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचे प्रचंड कौतुक केले. त्याला समर्थन देण्यासाठी आणि त्याची झलक पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते. पवनने श्रीजाला दिलेले प्रोत्साहन फुकट गेले नाही.

एप्रिल २०१५ पर्यंत श्रीजा तिच्या आजारातून आश्चर्यकारकपणे बरी झाली. लवकरच तिला हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आले. श्रीजा आपले वडिल नागैय्या, आई नागमणि आणि बहिण शर्मिला सोबत पवनला त्याच्या हैद्राबाद येथील कार्यालयात २० एप्रिल २०१५ रोजी जाऊन भेटली. श्रीजा अतिशय आनंदी दिसत होती. पवनने तिला हवी ती मदत करण्याचे वचन दिले. त्याने श्रीजाचा उपचार करणा-या डॉ. एएसए धरन यांचे विशेष कौतुक केले.

ही कथा पवन कल्याणचा केवळ कनवाळूपणाच दाखवत नाही तर त्याच्या मनात त्याच्या फॅन्स बद्दल असलेल्या प्रेमाला देखील दर्शवते. हा केवळ एकच प्रसंग आहे पवनने अशा अनेक प्रसंगांमध्ये अज्ञातपणे आपल्या औदार्याचा प्रत्यय दिला आहे. त्याच्या उदारतेची उदारणे तेलगु फिल्म उद्योगात प्रसिध्द आहेत. अशाप्रकारे, पवन  वास्तविक आयुष्यामध्ये देखील एक खराखूरा सूपरस्टार हे  सिध्द होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

२४ ते २६ जून रंगणार बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा पुणे...

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...