एल अँड टीच्या हेवी इंजिनियरिंग प्लँटचे इंडस्ट्री ४.० सह रुपांतर करणार
मुंबई, २९ मार्च २०२२ – एल अँड टी स्मार्ट वर्ल्ड अँड कम्युनिकेशन (एसडब्ल्यूसी) आणि व्होडाफोन आयडिया लिमिटेड (व्हीआय) यांनी एकत्र येत भारतात खासगी एलटीई एंटरप्राइज नेटवर्क उभारण्याचे ठरवले आहे. दोन्ही कंपन्या समूह व्यवसायात एल अँड टी हेवी इंजिनियरिंगच्या ए एम नाईक हेवी इंजिनियरिंग, हझिरा (सुरत) प्रुफ ऑफ कॉन्सेप्ट (पीओसी) कॅरी केले जाईल.
एल अँड टी एसडब्ल्यूसी आणि व्हीआय यांनी सरकारच्या सध्या सुरू असलेल्या ५जी ट्रायल्सचा एक भाग म्हणून सार्वजनिक सुरक्षा, स्मार्ट आणि कनेक्टेड हेल्थ अशा क्षेत्रांत ५जी युज केसेससाठी भागिदारी केली आहे. दोन्ही कंपन्या एल अँड टीचा स्मार्ट सिटी प्लॅटफॉर्म वापरून आयओटी, व्हिडिओ एआय टेक्नॉलॉजीजवर आधारित ५जी युज केसेसची चाचणी व प्रमाणीकरणासाठी एकत्र आल्या आहेत.
भारतातील दूरसंचार सेवांवर उभारण्यात आलेल्या मजबूत पायाच्या नेतृत्वाखाली जगभरातील ४.० उत्पादन क्रांती हाय- टेक आयओटी व कनेक्टेड उपकरणे वापरून आणण्यात आली आहे.
‘आमच्या मते खासगी व्यवसाय टिकून राहातील, वाढतील आणि इंडस्ट्री ४.० विकास मार्गावर व्यवसायांचे रुपांतर करण्यासाठी मदत करतील. आम्ही या तंत्रज्ञानाबद्दल आणि त्याच्या क्षमतेबद्दल उत्सुक आहोत. आम्ही आमचे भागीदार व्होडाफोन आयडिया यांच्या मदतीने भारतीय व्यवसायांचे मोठ्या प्रमाणावर डिजिटायझेशन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत,’ असे लार्सन अँड टुब्रोच्या संरक्षण आणि स्मार्ट तंत्रज्ञान विभागाचे संपूर्ण वेळ संचालक आणि वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष श्री. जे. डी. पाटील म्हणाले,.
व्हीआय व्यवसाय आणि त्याची व्यवसायांना नाविन्यपूर्ण तसेच विश्वासार्ह दूरसंचार सेवा पोहोचवण्याची क्षमता बागिदारी तसेच प्रमुख औद्योगिक कंपन्यांच्या भागिदारीच्या मदतीने व्यवसायासाठी सज्ज होत आहे. या ट्रायल्समुळे व्हीआय आणि त्यांचे भागीदार भारताशी संबंधित खासगी एलटीई युज केसेस स्पेक्ट्रमच्या पुरेशा वापरासह, समाजावर परिणाम होऊन देता तसेच सरकारच्या डिजिटल इंडियाच्या स्वप्नाच्या दिशेने प्रगती करत वापर करतील.
‘औद्योगिक उपाययोजनांच्या क्षेत्रात लीडर या नात्याने व्हीआय बिझनेसने सध्याच्या डायनॅमिक डिजिटल व्यवस्थेत व्यवसायांना स्वतःचा विकास करण्यासाठी सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही एल अँड टी स्मार्ट वर्ल्ड अँड कम्युनिकेशनशी भागिदारी करून खासगी एलटीईसाठी अत्याधुनिक अप्लिकेशन्स, नोकियाच्या तंत्रज्ञान कौशल्यांच्या मदतीने भविष्यवेधी ५जी नेटवर्क पायाभूत सुविधा उभारण्यासाठी उत्सुक आहोत. ही भागिदारी आमची ताकद आणि क्षमतांचे दर्शन घडवले आणि भविष्यातील व्यवसायांसाठी आवश्यक सेवांची निर्मिती करेल व पर्यायाने भारतात इंडस्ट्री ४.० चा वेगवान अवलंब होण्यास मदत करेल. आम्हाला विश्वास आहे, की या पायलटमुळे एल अँड टीच्या ए एम नाईक हेवी इंजिनियरिंग कॉम्प्लेक्स मॅन्युफॅक्चरिंग सेवेचे रुपांतर होईल व भविष्यात व्याप्ती वाढवण्यासाठी आवश्यक त्या क्षमता विकसित होतील,’ असे व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे मुख्य एंटरप्राइज बिझनेस अधिकारी अरविंद नेवातिया म्हणाले.
एल अँड टी एसडब्ल्यूसीकडे सफाईदार आयटी/ओटी इंटिग्रेशन आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान सेवांचा अनुभव असून कंपनी नेटवर्कची डिझाइन, चाचणी, अमलबजावणी आणि प्रमाणीकरणाचे तसेच युज केसेसच्या समाधानकारक वापराचे काम करेल.
‘आमच्या एल अँड टी हेवी इंजिनियरिंग वर्क्सच्या ‘ए एम नाईक हेवी इंजिनियरिंग कॉम्प्लेक्स’ येथे औद्योगिक वापरासाठीच्या खासगी एलटीई नेटवर्कच्या पीओसीसाठी व्यापक पीओसीचे आयोजन करत आहोत. आम्हाला खात्री आहे, की एलटीईमुळे आम्हाला सुधारित कनेक्टिव्हिटी/कव्हरेजसह ध्येय पूर्ण करण्यात मदत होईल तसेच विविध इंडस्ट्री ४.० अप्लिकेशन्समध्ये आयओटीचा वापर करून अधिक चांगले ऑटोमेशन साध्य करण्याच्या दिशेने जाता येईल,’ असे हेवी इंजिनियरिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष, प्रमुख आणि कार्यकारी समितीचे सदस्य अनिल व्ही परब म्हणाले.
खासगी एलटीई पीओसी जी नोकिया तंत्रज्ञानावर आधारित आहे, तिच्या मदतीने कव्हरेज, कम्युनिकेशन आणि ग्राहक अनुभव, मोठ्या यंत्रणांचे एकत्रीकरण, कनेक्टेड उपकरणे आणि उच्च पातळीची अचूकता लागणाऱ्या उत्पादन प्रक्रियांसाठी आवश्यक आयओटी एल अँड टी हेवी इंजिनियरिंग मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये उपलब्ध करून देईल.
‘व्हीआय बिझेनस आणि एल अँड टी एसडब्ल्यूसीशी भागिदारी करून भारतातील पहिल्या खासगी वायरलेस नेटवर्क्सपैकी क उभारताना आम्हाला आनंद होत आहे. आमचे या क्षेत्रातील आघाडीचे खासगी वायरलेस सोल्यूशन एल अँड टी उत्पादन सुविधेला व्यापकता, लवचिकता, सुधारित उत्पादनक्षमता, कार्यकारी कार्यक्षमता आणि डिजिटल रुपांतरणाला चालना देण्यासाठी आवश्यक कव्हरेज उपलब्ध करून देईल. अत्याधुनिक खासगी वायरलेस नेटवर्क अमलात आणत एल अँड टीच्या उत्पादन सुविधेला आपली प्रक्रिया स्वयंचलित करता येईल तसेच न्यू इंडस्ट्री ४.० युज केसेस आजमावता येतील,’ असे नोकियातील व्होडाफोन आयडिया सीटीचे प्रमुख प्रशांत मलकानी म्हणाले.
एल अँड टी स्मार्ट वर्ल्डद्वारे खासगी ५जीला प्री- पॅकेज्ड डिजिटल सेवा उपलब्ध केल्या जातात व त्यात नेटवर्क डिझायनिंग, रोलआउट, सायबर सुरक्षा आणि व्हर्च्युअलाइज्ड नेटवर्क्स (ओआरएएन) यांचा समावेश होतो. सिस्टीम इंटिग्रेटर म्हणून कम्युनिकेशन क्षेत्रातील कौशल्यासह कंपनी औद्योगिक रुपांतरणासाठी सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध करेल.