पुणे-
वाट हि चालली विठुरायाच्या दारी,
घेवूनी पुण्याची मायेची शिदोरी
उत्स्फूर्त झाली तुझ्या दर्शनाला स्वारी ...
पुण्यातून आपला मुक्काम संपवून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा पुढील प्रवाससाठी मार्गस्थ झाल्या .या दोन्ही पालख्या पुण्यात पुण्यात नानापेठ व भवानी भवानी पेठेत मुक्कामी होत्या.तुकाराम महाराज यांची पालखी निवडूंगा विठोबा मंदिरात तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी होत्या.त्याची तयारी दोन्ही मंदिरात जोरदार होती.दोन दिवस मुक्काम असल्याने मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली .आज पहाटे दोन्ही पालख्या हडपसर पर्यत एकत्र गेल्या आणि तेथून वेगवेगळ्या रस्त्याने मार्गस्थ झाल्या .
संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबारायांची पालखी आज पंढरीकडे निघाली. यावेळी नवचैतन्य हस्य क्लबचे सदस्य सहभागी झाले होते.
वारकऱ्यांना नाही धर्म-पंथाची सीमा… संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी एक पंजाबी कुटूंब भजन गाताना दिसत होते
फुगडी खेळत पालख्यांना निरोप-ज्ञानोबा-तुकोबारायांच्या पालख्या आज पंढरपूरकडे निघाल्या,या वेळी सेंट मेरीजमधील विद्यार्थीनी फुगडी खेळताना दिसत होत्या