बालेवाडी ते पंढरपूर :बालवडकरांच्या मोफत यात्रेत ६०० भाविक सहभागी
पुणे-दरवर्षीप्रमाणे नगरसेवक अमोल बालवडकर आयोजित बालेवाडी ते पंढरपुर मोफत यात्रेच्या यंदाच्या २६व्या वर्षी ६०० भाविकांनी सहभाग नोंदविला .या यात्रेचा आज आरंभ झाला यावेळी पुण्यनगरीच्या महापौर मुक्ता टिळक या प्रमुख पाहुण्या म्हणुन भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत्या. या वेळी बाणेर बालेवाडी चे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वरभाऊ तापकीर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका गायत्री खडके, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते रवि घाटे ,हभप संजय बाप्पु बालवडकर, सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब सुतार, हभप बबनराव चाकणकर, हभप पांडुरंग महाराज इंगवले, भुमाता किसान मंच अध्यक्ष अनिलतात्या बालवडकर, हभप धारुतात्या बालवडकर उपस्थित होते.
यावेळी औंध प्रभाग समिती सदस्य पदी नव्याने निवड झालेले सचिन पाषाणकर व शिवम आबासाहेब सुतार यांचा सन्मान महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आला .तसेच युवा उद्योजक हेमंत कळमकर व आमचे बंधु अमोल पाडाळे यांना वाढदिवसानिमित्त महापौरांनी शुभेच्छा दिल्या .
यावेळी बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते .
बालेवाडीतून ६०० भाविक बसने विठ्ठल दर्शनासाठी या यात्रेच्या माध्यमातून नेण्यात येतात . त्यांच्या सुविधांसाठी विशेष प्रयत्न केले जातात .