पु. ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील, लोककला साहित्य “गोडाऊन”मध्ये जतन होणार..?

Date:

मुंबई – प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या “स्वरालय” दालनात लोककलेच्या संबंधित विविध ध्वनिफिती आणि चित्रफित साहित्याचे जतन करण्यात आले आहे.परंतु हे सर्व साहित्य आता गोडाऊनमध्ये टाकण्याचा सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रशासनाचा निर्णय झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
साधारणपणे १९५० सालापासूनचे सांस्कृतिक कार्य विभागाने विविध लोक कला महोत्सव, चित्रपट महोत्सव, नाट्य महोत्सव या अशा अनेक कार्यक्रमाचे ध्वनिफिती (ऑडिओ) आणि चित्रफित (व्हिडीओ) याचे कला अकादमीच्या दुसऱ्या मजल्यावरील “स्वरालय” दालनात जतन केले आहे.विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी ज्या लोककलेचे विद्यापीठामार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले.त्यांच्या चित्रफित आणि ध्वनिफिती सुध्दा या दालनात ठेवण्यात आलेले आहे. परंतु सांस्कृतिक कार्य खात्याच्या प्रशासनाला या सर्व लोककला साहित्याची आता चागलीच अडचण होवू लागली आहे.त्यामुळे आता हे सर्व साहित्य गोडाऊनमध्ये टाकण्याचा विचार संबंधीत अधिकारी घेणार असल्याचे कळते.
खरं तर यापूर्वी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी लोककलेचे जतन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य खातं योग्य पाऊल उचलत आहे.असे म्हणाले होते.मात्र अद्याप लोककला सर्व्हेक्षण बाबत मंत्र्यांनी एकही बैठक घेतलेली नाही.त्यामुळे निधी अभावी आता लोककला सर्व्हेक्षणला अडथळे निर्माण होत असल्याचे समजते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

5,000रु. पर्यंतच्या यूपीआय व्यवहारांसाठी फिंगरप्रिंट किंवा चेहरा ओळखीद्वारे पेमेंट प्रमाणीकरणाची सुविधा सुरू

मुंबई: आयसीआयसीआय बँक ने iMobile या बँकेच्या मोबाईल बँकिंग सुविधेद्वारे यूपीआय व्यवहारांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची अंमलबजावणी जाहीर केली आहे. या सुविधेमुळे  5,000 रु. पर्यंतचे व्यवहार चेहरा ओळख किंवा फिंगरप्रिंट प्रमाणीकरणाद्वारे अधिकृत करू शकत असल्यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक सुधारतो. या नवीन सुविधेमुळे या मर्यादेपर्यंतच्या व्यवहारांसाठी यूपीआय PIN मॅन्युअली टाकण्याची गरज राहत नाही. बायोमेट्रिक्स सादर होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी ‘शोल्डर-सर्फिंग’चा धोका कमी होतो आणि जलद पेमेंट्स आणि सुरक्षितता असे दुहेरी फायदे मिळतात. ग्राहक पिअर टू पिअर  पैसे हस्तांतरण, दुकानातील पेमेंटसाठी QR स्कॅन करणे किंवा ऑनलाइन पेमेंट्स अशा यूपीआय व्यवहारांना त्यांच्या बायोमेट्रिक्सद्वारे अधिकृत करू शकतात. 5,000 रु. पेक्षा जास्तीच्या व्यवहारांसाठी ग्राहकांना पेमेंट अधिकृत करण्यासाठी त्यांचा सध्या वापरत असलेला  यूपीआय PIN आवश्यक असेल. आयसीआयसीआय बँकेचे प्रवक्ते म्हणाले, “आमच्या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे नेहमीच आमच्या कामकाजाच्या केंद्रस्थानी राहिले आहे आणि आमच्या ग्राहकांना प्रगत डिजिटल उपायसुविधा पुरविण्यावर आमचा विश्वास आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरण सादर करणे हे सध्याच्या नियामक मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत आहे आणि अधिक सुरक्षित व अखंड पेमेंट अनुभव सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. iMobile वर डिव्हाइस-स्तरीय बायोमेट्रिक पडताळणीचा उपयोग करून सुलभ वापर सुनिश्चित करत आम्ही व्यवहारांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार आणि सोयीप्रमाणे PIN-आधारित आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण यापैकी निवड करण्याची लवचिकताही उपलब्ध आहे.” ही सुविधा Android – v30 आणि IOS – v28.2 या iMobile अॅपच्या अत्याधुनिक व्हर्जन्सवर उपलब्ध आहे. Android वापरकर्ते फिंगरप्रिंटद्वारे व्यवहार अधिकृत करू शकतात तर IOS वापरकर्ते फेस रेकग्निशन म्हणजेच चेहरा ओळखीद्वारे हे करू शकतात. iMobile वापरकर्ते काही सोप्या कृतीद्वारे बायोमेट्रिक ऑथेंटिकेटर सहज सक्रिय करू शकतात: ·         iMobile अॅपमध्ये लॉग इन करा ·         UPI पेमेंट्सवर क्लिक करा आणि UPI सेटिंग्स निवडा ·         बायोमेट्रिक सक्षम करण्यासाठी खाते क्रमांक निवडा ·         ‘Use biometric for payments’ निवडा आणि ‘proceed’ वर क्लिक करा ·         पडताळणीसाठी आपला UPI PIN टाईप करा ·         डिव्हाइस-स्तरीय बायोमेट्रिक डेटा प्रमाणीकरण करा

सह्याद्री हॉस्पिटलचा न्यूरोसर्जरीत जागतिक विक्रम:5 वर्षांत 750 हून अधिक ‘एमव्हीडी’ शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे- सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने न्यूरोसर्जरी (मेंदू शस्त्रक्रिया) क्षेत्रात...

दिल्ली हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणीत अश्लील व्हिडिओ हॅकर्स ने चालविला, गाणीही वाजली, मुख्य न्यायमूर्तींनी सुनावणी थांबवली

नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अश्लील...