मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आर्यन पंप्सच्या ग्लोबल डिझाइन आणि इनोव्हेशन सेंटरला भेट

Date:

‘मेड इन महाराष्ट्र, मेड फॉर द वर्ल्ड’ अभिप्रायासह उद्योजक आणि अभियंत्यांच्या कौशल्याचे केले कौतुक

पुणे, दि. ३०: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनापती बापट रस्त्यावरील आर्यन हाऊस येथे कार्यरत असलेल्या आर्यन पंप्स अँड एन्व्हायरो सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या ग्लोबल डिझाइन आणि इनोव्हेशन सेंटरला भेट देऊन तेथील संशोधन व तंत्रज्ञानविषयक कामकाजाची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी ‘मेड इन महाराष्ट्र, मेड फॉर द वर्ल्ड’ अभिप्रायासह उद्योजक आणि अभियंत्यांच्या कौशल्याचे कौतुक केले.

या केंद्रामार्फत कंपनीच्या जागतिक गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन व विकासाचे काम केले जाते. या केंद्रात विकसित करण्यात आलेले अत्याधुनिक हायड्रॉलिक पंप, विशेष उपयोगासाठीचे इंजिनचलित पंप संच, जेटिंग रिसायकलर्स तसेच आपत्कालीन सेवांसाठी आवश्यक असलेल्या ‘फर्स्ट रिस्पॉन्स वाहनां’च्या डिझाइन व संशोधन प्रक्रियेची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घेतली.

तत्पूर्वी कंपनीने तयार केलेल्या अत्याधुनिक भव्य पंप यंत्रणा बसविण्यात आलेल्या वाहनाचीही त्यांनी पाहणी केली. या वाहनावर ‘मेड इन महाराष्ट्र, मेड फॉर द वर्ल्ड’ असा अभिप्राय नोंदवत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील उद्योजक आणि अभियंत्यांच्या कौशल्याचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्रात विकसित होणारे तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी कौशल्य जागतिक स्तरावर पोहोचत असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

आर्यन पंप्स अँड एनवेरो सोलुशन प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत सुतार यांनी कंपनीकडून विकसित केल्या जाणाऱ्या संशोधनाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी कंपनीला आणि अभियांत्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मेट्रोचे व्यवस्थापकी संचालक श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘राणा सूर्यवंशीला वाचवणारे कोण? पुणे पोलिसांवर दबाव आहे का?’; रवींद्र धंगेकरांचा गृहमंत्री फडणवीसांना सवाल

स्वतःवर गोळीबाराचा बनाव रचल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्याची मागणी;...

सारसबागेजवळ कारमध्ये आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली; बेपत्ता शुभ्रत बनसोडेचा संशयास्पद मृत्यू

वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी घराबाहेर पडलेला तरुण परतलाच नाही;...

महाराष्ट्राच्या मुळावर उठलेले विनाशकारी वाढवण बंदर रद्द झाल्याशिवाय लढा थांबणार नाही: हर्षवर्धन सपकाळ

वाढवण बंदर विरोधी जनआक्रोश मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा, सरकारच्या...