पोलिसांची यात्रेतील पाळणे वाल्यांना ‘अर्थपूर्ण ‘ताकीद ?
ओतूर –
ओतूरचे ग्राम दैवत श्री कपर्दिकेश्वर यात्रा दरवर्षी श्रावण महिण्यात मोठ्या प्रमाणात भरते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन लाखो भाविक ओतूर ( ता.जुन्नर ) मध्ये दाखल होतात.
यात्रेत पाळणेवाले,फुगेवाले,खेळणीवाले, मनोरंजनाचे खेळ करणारे तसेच हॉटेल व्यावसायिक दुरवरून दरवर्षी छोटे मोठे व्यसायिक व्यवसायाच्या निमित्ताने ओतूरमध्ये येतात.दरम्यान सोमवारी (दि.१३)पहिला श्रावणी सोमवार व यात्रेचा पहिला दिवस होता.मात्र दुपारपर्यंत पाळणे बंद असल्याने येणा-या यात्रेकरुंनी याबाबत चर्चा सुरु केली व हा विषय संबंधीत पाळणेवाल्यांसोबत विचारना केली असता पोलिसांनी पाळणे सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक सोमवारी ४० हजार असे १ लाख ६० हजार रुपयाची मागणी झाल्याचे समजते.यामुळे पाळणे बंद ठेवण्यात आले होते पैशांची मागणी केली असल्याने पैसे दिले नाहीत म्हणुन पाळणे बंद आहेत हा प्रकार काही ग्रामस्थांच्या कानावर गेला व पैसे दिले तरच पाळणे चालु ठेवा असा दमच जणु पोलिसांनी पाळणे वाल्यांना दिला अशी चर्चा गावभर झाली.
एवढ्या दुरवरून येणाऱ्या व्यावसायिकांना एवढी रक्कम द्यायची कशी आणि कुठुन असा प्रश्न पडला. त्यानंतर सर्व व्यावसायिकांनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन सबंधित अधिकाऱ्याकडे धाव घेतली सबंधित अधिकाऱ्याने आमच्या माणसांबरोबर (कर्मचाऱ्याशी) काय ? ते ….बोला ! असे सांगीतले.पोलिस तडजोड करण्यासाठी तयार नसल्याने सबंधित पाळणेवाल्यांनी श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेचे काही पदाधिकारी,ओतूरचे सरपंच,श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व ओतूर येथील पत्रकारांना या बाबतची हकिकत सांगीतली.व त्यानंतर जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनाही सबंधित पाळणेवाल्यांकडे पैशाची मागणी करतात अशी तक्रार गेली.त्यानंतर ताबडतोब आमदारांनी ओतूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांंना या बाबत जाब विचारणा केल्यावर पोलिसांनी लागलीच काढता पाय घेऊन शेवटी आमदारांनी फोन केल्यावर या पाळणेवाल्यांचे पाळणे सोमवारी सायंकाळच्या सुमारास सुरू झाले.मात्र या घटनेमुळे ओतूर पोलिसांबद्दल नागरिकांमधे नाराजीचा सुर निघत असुन याबाबत पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान सदर घटनेबाबत ओतुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरज बनसोडे यांची पोलिस ठाण्यात भेट घेऊन प्रतिक्रीया मागितली असता याबाबत त्यांनी प्रतिक्रीया देण्याचे टाळले.