भारतीय रक्षालेखा सेवा(IDAS) आणि भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी यांच्यात मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन

Date:

पुणे- भारतीय रक्षा लेखा सेवा आणि भारतीय महसूल सेवा अधिकारी यांच्यातमुंडव्यातील कॅडेन्स क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट मैदानावर, प्रधान रक्षा लेखा नियंत्रक (सदर्न कमांड)कार्यालय, पुणे यांच्या सौजन्याने मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, दीर्घकाळापासून सुरू असलेल्याकोविडच्या जागतिक साथीच्या प्रादुर्भावापासून आणि त्याच्याशी निगडित अनेक त्रास आणि विचलनांपासून मुक्त होण्यासाठी, डिसेंबरच्या गुलाबी थंडीचा आनंद घेत, हा क्रिकेट सामना अतिशय उत्साही आणि सौहार्दपूर्ण वातावरणात रंगला.
सामना सुरू होण्यापूर्वी,रक्षा लेखाप्रधान नियंत्रक, डॉ. राजीव चव्हाण,IDAS,ndc, यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातसांगितले कीकोविड-19 साथीच्या आजारामुळे सार्वजनिकव मानसिक आरोग्य बिघडले आहे. कळत-नकळत माणूस एकमेकांपासून दूर आणि मोबाईलच्या खूप जवळ गेला आहे.माणसाचे माणसापासून अंतर कमी करण्यासाठी आणि त्याला त्याच्या दैनंदिन कार्यालयीन कामातून बाहेर काढून, मैदानावरील शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत करण्यासाठी, लोकांमध्ये परस्पर बंधुभाव वाढवण्यासाठी आणि दैनंदिन जीवनात काही बदल घडवून आणण्यासाठी, या मैत्रीपूर्ण सामन्याचे आयोजन केलेले आहे.
यावेळी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली की, रक्षालेखा विभागाच्यापुणेस्थितरक्षा लेखाप्रधान नियंत्रक(सदर्न कमांड)कार्यालय, जानेवारी किंवा फेब्रुवारी 2024 मध्ये, पुण्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये, 20-20 क्रिकेट नॉकआउट टूर्नामेंट आयोजित करणार आहे. ज्याचा तपशील लवकरच सर्व संबंधितांना दिलाजाईल.
सकाळी 9.30 वाजता प्रथम मैदानावरील नाणेफेक डॉ. राजीव चव्हाण,IDAS,ndc, यांच्या हस्ते करण्यात आली. भारतीय रक्षालेखा सेवा (IDAS) संघाचे कर्णधार, श्री आनंद अग्रवाल, IDAS यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात, 108 धावा केल्या. दोन्ही संघांमधील सामना अत्यंत चुरशीचा झाला, ज्यामध्ये श्री अमित बोबडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय महसूल सेवा (IRS) संघाने, 6 गडी राखून विजय मिळवला.श्री अजय ढोकेयांनासामनावीर घोषित करण्यात आले. तसेच श्री. मल्लिकार्जुन उत्तुरे यांना सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि श्री. गणेश सोनटक्के यांना सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून घोषित करण्यात आले. या उत्कृष्ट खेळाडूंना आणि विजेत्या संघाला, डॉ. राजीव चव्हाण, रक्षा लेखाप्रधान नियंत्रक, IDAS, NDC यांच्या हस्ते भव्य ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
हा संपूर्ण सामना यशस्वी करण्यात, रक्षा लेखाप्रधान नियंत्रक (दक्षिण कमांड), पुणे कार्यालयातील प्रशासन IV आणि प्रशासन III विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांचे मोलाचे योगदान होते, ज्यांनी संपूर्ण जबाबदारीने आणि कर्तव्यदक्षतेनेपूर्ण पाडण्याची उल्लेखनीय कामगिरी बजावली. या T-20 सामन्याचे समालोचन डॉ. अनिल कुडिया आणि ब्रिजेश शुक्ला यांनी अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीमध्ये केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

क्रांतीज्योती बाल संगोपन योजनेचा 8 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

पुणे, दि. 22: माहे एप्रिल 2025 अखेर क्रांतीज्योती बाल...

YES BANK तर्फे नफ्यात सातत्यपूर्ण वाढ,तिमाहीत 1,068 कोटी रु.चा निव्वळ नफा

विकासाला गती, CASA मध्ये उत्कृष्ट कामगिरी, सुधारित मार्जिन्स आणि...

गोदरेज इंडस्ट्रीजचे २०३१ पर्यंत ५ लाख कोटींचे उद्दिष्ट

'१८९७ पासून निरंतर निर्मिती, प्रत्येक येणाऱ्या उद्याची' (Crafting tomorrow since 1897) हे कंपनीचे सामायिक ध्येय मुंबई, २२ एप्रिल, २०२६: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आज आपले नवे ध्येय आणि नवी ब्रँड ओळख प्रस्तुत केली....