नागपूर :अब्दुल सत्तर यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक आज ‘भ्रष्ट मंत्र्यांवर सरकार कारवाई करत नाही ‘ असा आरोप करून सभात्याग करून बाहेर गेल्यावर अब्दुल सत्तर यांनी ,’ समोर बसलेल्या विरोधकांनीसारख्या जमिनी हडप केल्या नाहीत. विरोधी बाकावर बसलेल्या विरोधकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी हडप केल्या, असा आरोप विरोधी पक्षावर केला.आणि गायरान जमीन वाटप प्रकरणात उच्च न्यायालय जो निर्णय देईन तो निर्णय मान्य असेल, असे सांगत आपले स्पष्टीकरण देखील विरोधकांच्या अनु प स्थितीतच दिले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात जाऊन अवैधरित्या गायरान जमिनीचं वाटप केल्याचा आरोप करुन गेल्या तीन दिवसांपासून शिंदे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. दररोज सकाळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधक सत्तारांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करत आहेत. आपल्यावर झालेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी सत्तारांनी करेक्ट टायमिंग साधत विरोधकांचा सभात्याग होताच भावुक होऊन आपल्यावरील झालेल्या सगळ्या आरोपांचं खंडन करत माझ्या आदेशामुळे शासनाचे कुठलेही नुकसान झाले नाही. उच्च न्यायालय जो निर्णय देईन तो निर्णय मान्य असेल, असं सांगितलं.वाशीम जिल्ह्यातील १५० कोटी रुपये किमतीची गायरान जमीन एका खासगी व्यक्तीला बेकायदा बहाल केल्याचा आरोप करत, महसूल राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधानसभेचे कामकाज विरोधकांनी रोखून धरलं होतं. मात्र मंगळवारी विरोधकांनी या मुद्द्यावर आश्चर्यकारकरित्या मौन पाळले. मंगळवारी विरोधकांनी सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अवाक्षरही न उच्चारल्याने आश्चर्य व्यक्त झालं. आजही विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तू तू मैं मैं रंगल्याचं पाहायला मिळालं. सरकार भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घातल असल्याचे सांगत विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. तेच टायमिंग साधून सत्तार आपल्यावर झालेल्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी विधानसभेत उभे राहिले.गाव नमुन्यात काहीही बदल झाला नाही. माझ्या आदेशामुळे शासनाचे कुठलेही नुकसान झाले नाही. उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य असेल, असं सांगतानाच माझ्यावर झालेल्या आरोपात काही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिले. मी एका मागासवर्गीयाला न्याय दिला, मी काहीही चुकीचे केले नाही, असं ते म्हणाले .