दुर्बल घटकांना आर्थिक मदत करून मगच लॉकडाऊन लागू करा

Date:

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी
मुंबई। राज्यातील कोरोनाच्या वाढत्या समस्येवर तोडगा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कडक लॉकडाऊनवरच भर आहे. मात्र, तत्पूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करणे गरजेचे आहे. जनतेच्या अडचणींवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करु नये, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या व्हर्चुअल बैठकीनंतर आ. पाटील कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या सर्व प्रयत्नांना भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे. मात्र, हे प्रयत्न करत असताना सर्वसामान्य माणूस भुकेनं मरणार तर नाही ना, याची दखल राज्य शासनाने घेतली पाहिजे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या सर्वच नेत्यांनी हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे, तसेच त्यावर मार्गही सुचविले आहेत. त्याचा शासनाने गांभीर्याने विचार करुन निर्णय केला पाहिजे.
त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व आमदारांना शासनाने विकासकामांसाठी दोन कोटीचा निधी वाढवून दिला आहे. राज्यातील जवळपास ३५० आमदारांना ७०० कोटींच्या आसपास हा निधी मिळतो. हा वाढीव निधी कोरोनावर उपाययोजना आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची परवानगी दिली पाहिजे.‌ 
आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सध्या निधीआभावी आज कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी रुग्णालयांची दमछाक होत आहे. राज्य सरकारही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पॅकेज जाहीर करण्यासाठी निधीच्या कमतरतेचं कारण देत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आमदारांना दोन कोटीचा वाढीव निधी दिला आहे. तो कोरोनासाठी खर्च करण्याची मुभा द्यावी. हा वाढीव निधी उपलब्ध करून दिल्यास समस्या आरोग्य यंत्रणांवरचा ताण कमी होईल, आणि नागरिकांना अधिक चांगले उपचार मिळतील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...