पुणे : आज दुपारीच , पुणेकरांना शहराबाहेर गेलात आणि पुन्हा आलात तर १५ दिवस कोरोंटाइन करावे लागेल असा इशारा देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आपल्याच पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनात त्यांनीच जाहीर केलेल्या कोरोना विषयक नियमांची खच्चून पायमल्ली दिसली आणि धरता हि येत नाही आणि सोडताही येत नाही असे म्हणून दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली . शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही नव्या कार्यालयाच्या पहिल्याच दिवशी उद्घाटनाच्या समयी प्रास्ताविकात दिलगिरी व्यक्त केली .काही वृत्त वाहिन्यांनी राष्ट्रवादीच्या या कृतीवर दणाणून टीका केली आणि लोका सांगे ब्रम्हज्ञान ..आपण स्वतः कोरडे पाषाण म्हणत राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले .
शनिवार ,रविवार पुण्यात कडक लॉक डाऊन असताना आज शनिवारीच सायंकाळी राष्ट्रवादीच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी झाली होती . या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन झाले.दरम्यान, अजित पवार यांनी याबाबत दिलगरी आणि खंत व्यक्त केली . विरोधकांनी आघाडी सरकावर जोरदार टीका केली आहे.
वाद नको गटतट नको मतभेद नको; अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला
यावेळी अजित पवार यांनी असेही म्हटले कि ,’पक्षासाठी काम करताना वाद नको, गटतट नको, मतभेद नको. सर्वांचा मान ठेवा. पवार साहेब तसेच वागतात. आदराची वागणूक ज्येष्ठांना मिळेल याची काळजी घ्या.पुणे आणि पिंपरी चिंचवड ला पर्यटन साठी काय करता येईल यावर काम सुरू आहे. इथे रोजगार तयार व्हावा ही अपेक्षा आहे. कोणी काही टीका केली तर ऊत्तर द्यायच्या फंदात पडू नका. राज्याचे नेते बोलतील असे सांगा. हानी होईल असे वर्तन होणार नाही कार्यालयाची पायरी चढताना याची काळजी घ्याशिवसेनेचा आज वर्धापनदिन त्यांना शुभेच्छा देतो.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आज वाढदिवस त्यांंना शुभेच्छा देतो. तुम्ही नियमांचे पालन केले नाही ही माझी खंत आहे. ती व्यक्त करायलाच हवी.
अजित पवार म्हणाले की, गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला. मात्र कार्यकर्यांचा हिरमोड झाला असता, मात्र त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो, असं पवार म्हणाले