पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 62 हजार 35

Date:

पुणे विभागातील 6 लाख 45 हजार 603 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 7 लाख 24 हजार 654 रुग्ण

पुणे, दि. 27 :- पुणे विभागातील 6 लाख 45 हजार 603 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 लाख 24 हजार 654 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 62 हजार 35 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 17 हजार 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.35 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 89.09 टक्के आहे.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 99 हजार 784 रुग्णांपैकी 4 लाख 37 हजार 185 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 52 हजार 930 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 669 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.93 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.47 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 63 हजार 743 रुग्णांपैकी 59 हजार 105 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 755 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 883 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 58 हजार 947 रुग्णांपैकी 52 हजार 862 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 166 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 919 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 540 रुग्णांपैकी 47 हजार 260 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 499 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 781 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 640 रुग्णांपैकी 49 हजार 191 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 685 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 761 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 8 हजार 455 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 7 हजार 90, सातारा जिल्ह्यात 495, सोलापूर जिल्ह्यात 640, सांगली जिल्ह्यात 147 तर कोल्हापूर जिल्ह्यात 83 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 348 आहे. पुणे जिल्हयामध्ये 3 हजार 756, सातारा जिल्हयामध्ये 275, सोलापूर जिल्हयामध्ये 189, सांगली जिल्हयामध्ये 86 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 42 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 47 लाख 14 हजार 358 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 7 लाख 24 हजार 654 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 26 मार्च 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेने पाण्याचे टँकर मोफत पुरवावेत..

जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी विहिरी, बोअरवेल महापालिकेकडे सुपूर्त. कराव्यात: संकट काळात...

पुण्यात पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार , शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट

पुणे :गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरांमध्ये हजेरी...

वरुणराजा ऐकेना..धरणात पाणी साठेना…

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण समूहातील चारही...