सारसबाग पावभाजी गल्ली ते पेशवे पार्क रोडवर दोन्ही बाजूस नो-पार्कींग झोन

Date:

रस्त्यावरील पाव भाजीवाल्यांच्या स्टॉल ला मिळणार संरक्षण ?

पुणे, दि. 3 :- दत्तवाडी वाहतूक विभागांतर्गत सारसबाग खाऊ गल्ली अंतर्गत रोड ते पेशवे पार्क गेट पर्यंत जाणा-या रोडवर दोन्ही बाजूस अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी खेरीज अन्य वाहनांसाठी नो-पार्कींग करण्यात आले असल्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांनी निर्गमित केले आहेत.
याबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला नं. 6, येरवडा पोस्ट ऑफीसजवळ, पुणे- 6 यांच्या कार्यालयात दिनांक 8 मार्च 2021 पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असेही वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

दरम्यान हा निर्णय घेताना येथील रस्त्यावरील पाव भाजीवाल्यांच्या अतिक्रमणांना संरक्षण मिळेल कि नाही याचा विचार करूनच हा प्रस्ताव केल्याचा आरोप होणार आहे. पण अर्थातच येथील स्टॉल धारक आपली बाजू मांडण्यास अर्थातच पूर्णतः यशस्वी होतील . आणि लोक काही हरकती घेणार नाहीत , घेणारे नाममात्र स्वरूपात घेतील . गेली कित्येक वर्षे येथे स्टॉल च्या पुढे खुर्च्या मांडव टाकून होणार्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचेही थांबले आहे. त्यामुळे सुरुवातीला वाहतुकीसाठी खुला असलेले हा रस्ता आता खाऊ गल्लीला बहाल झाल्याचे स्पष्ट होणार आहे. येथे येणाऱ्या नागरिकांना वाहने लावण्यासाठी मात्र पुरेसे वाहनतळ नाही आहे ते अपुरे आहे.आणि आता या रस्त्या ऐवजी पुढील रस्त्याचा वापर येण्या जाण्या साठी करावा असाही प्रस्ताव पुढे आल्यास नवल वाटणार नाही .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...